शिवसेना कुठरे विभागाच्या वतीने अतिवृष्टी बाधीतांना जीवनावश्यक वस्तूंचे किट वाटप


तळमावले | कृष्णाकाठ वृत्तसेवा : 
संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रात न भूतो अशी अतिवृष्टी झाल्यामुळे मोठे संकट निर्माण झाले . त्यामुळे अनेकांचे संसार उध्वस्त झाले . पाटण तालुक्यातील कोयनानगर भागातील मिरगांव , बाजे , गोकुळनाला , आंबेघर, कामरगाव , ढोकावळे , हुंबरळी , नवजा तर ढेबेवाडी विभागातील जितकरवाडी , जोशीवाडी (काळगाव ) येथील लोकांना महाभयंकर फटका बसला . अतिवृष्टीने त्यांचे  जनजीवन विस्कळीत झालेले आहे .

    अशा संकटाच्या काळात सामाजीक बांधिलकी व मानवतेच्या भावनेनुन शिवसेना कुठरे पंचक्रोशी तर्फे भारतीय मराठा संघाचे अध्यक्ष अविनाश पवार दादा व मर्चंट सिंडिकेट क्रेडिट सोसायटीचे संस्थापक अनिल शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पाटण तालुका शिवसेना संघटक सुनिल पवार यांनी कोयना भागातील मिरगांव , बाजे, गोकूळनाला या जि .प. प्रा . शाळा कोयनानगर येथे तात्पुरते पुनर्वसन केलेल्या गावांना जीवनावश्यक वस्तूचे साहित्य त्यांच्या मागणीनुसार किराणा साहित्य, मसाले साहित्य, द्रोण- पत्रावळी ,चहाचे कप , डिश व कपडे इ . वाटप करण्यात आले .

      या योगदानामध्ये बाळकृष्ण केबल नेटवर्क तळमावलेचे शिवाजी सुर्वे, शिवसेना पाटण तालुका संघटक बाबासो निवडुंगे, वसंत लोकरे भाऊ , शशिकांत शिंदे, साई प्रतिष्ठान बादेवाडी, रघुनाथ शिंदे, संजय जाधव, अधिकराव शिंदे, अनिल जाधव, रविंद्र चव्हाण, अनिल लोकरे, राहुल लोहार, जयवंत कदम, अनिल कदम, रणजीत पवार आदींचा समावेश होता .

     सदर मदत ही शिवसेना सातारा जिल्हाप्रमुख जयवंतराव शेलार (माऊली) , मर्चंट सिंडीकेट संस्थेचे संस्थापक अनिल शिंदे , अंगणवाडी सेविका सौ . संगीता म्होहळकर, सौ. सुमन यादव मॅडम, समाजसेवक चंद्रकांत चाळके, संभाजी चाळके, बाबासो निवडुंगे, सुनिल पवार व शशिकांत शिंदे यांच्या उपस्थितीत देण्यात आली.