समाजसेवेचा लढा अविरत सुरू ठेवून कुंभारगाव पंचक्रोशीच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव प्रयत्नशील राहणार : सौ.सारिका पाटणकर
कुंभारगाव | कृष्णकाठ वृत्तसेवा : 
राजकीय दृष्ट्या अतिशय संवेदनशील असणारे गाव या गावाने, गावातील सुपुत्रांनी दिल्लीच्या राजकारणात आपले स्थान निर्माण केले याच गावातील सुपुत्राने मुख्यमंत्री म्हणून संपूर्ण महाराष्ट्र राज्याचा आदर्शवत कारभार केला. एक आदर्श व कार्यक्षम मुख्यमंत्री म्हणून त्यांनी आपला ठसा राजकारणाच्या पटलावर कोरला. देशात व राज्यात कुंभारगाव चे नाव नकाशात अधोरेखीत केले असे पाटण तालुक्यातील कुंभारगाव या गावातील राजकीय-सामाजिक परंपरेचा आदर राखत गावातील युवक, महिला गावच्या विकासासाठी पुढे आल्या व समाजसेवेचे व्रत धारण करून जनसामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी युवा नेतृत्वांचा जन्म झाला यातून काही नेतृत्व बहरत गेली व त्यांनी देशाच्या व राज्याच्या राजकारणात समाजकारणात अनेक महत्वाची पदे पादाक्रांत केली. याच परंपरेचा, समाजसेवेचा वसा याच गावातील युवा उद्योजक योगेशजी पाटणकर व त्यांच्या सुविद्य पत्नी सौ.सारिका पाटणकर यांनी गावच्या विकासासाठी समाजसेवेचे इंद्रधनुष्य खांद्यावर घेतले व ते लीलया पेलले सुद्धा व यशस्वी केले.

पुणे, मुंबई येथे उद्योग व्यवसायाचा व्याप असूनही सर्वसामान्यांसाठी समाजसेवेचे व्रत अंगीकारून आपल्या जन्मभूमी चे उपकार कधीही न विसरता आपल्या मातीशी सदैव नाळ असणारे पाटणकर दांपत्य एक आदर्शवत आहेत. सौ.सारिका पाटणकर एक उच्चशिक्षित महिला गावच्या सरपंच झाल्या सदस्य ते सरपंच असा राजकीय प्रवास व इथूनच राजकारणाची व समाजकारणाची मुहूर्तमेढ रोवली गेली. गावच्या विकासासाठी अनेक योजना कार्यान्वित केल्या, कोविड सारख्या महाभयंकर संकटात जनतेला आधार देत प्रशासनाबरोबर खांद्याला खांदा लावून काम करत गावाला कोरोना मुक्त करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले अशा कोरोना योध्या एक आदर्श सरपंच सौ. सारिका पाटणकर यांचा आज जन्मदिन यांच्या वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन.

वाढदिवसा निमित्ताने जीवनात प्रत्येक व्यक्ती एक संकल्प करत असते आणि तो संकल्प पूर्ण करण्यासाठी अथक प्रयत्न ही करत असते. सरपंच म्हणून व एक महिला म्हणून भविष्यातील त्यांचे संकल्प सुद्धा खूप आदर्शवत आहेत. वृद्धांना खऱ्या अर्थाने मायेचा आधार देण्यासाठी निराधार महिलांसाठी एक शाश्वत आधार केंद्र कुंभारगावात सुरू करून त्यांना आधार देऊन त्यांच्या दु:खावर फुंकर घालण्याचे काम करण्याचा मनोदय सौ.सारीका पाटणकर यांनी व्यक्त केला.

 कुंभारगांव विकास कामांबाबत अग्रस्थानी कसे असेल यासाठी प्रामाणिक प्रयत्न करणार आहोत. कुंभारगांवच नाही, तर कुंभारगांव-काळगांव जिल्हा परिषद मतदार संघातील प्रत्येक गावातील अडीअडचणी सोडवून तिथे विकासाची गंगा आणण्यासाठी आमचा सदैव प्रयत्न राहील, असे सरपंच सौ.सारिका व श्री. योगेशजी पाटणकर यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले. वाढदिवसानिमित्त त्यांच्या कार्याचा अल्पपरिचय.

कुंभारगावच्या प्रथम नागरिक सरपंच सौ. सारिका योगेश पाटणकर यांचा आज वाढदिवस. राजकीय आणि सामाजिक दृष्ट्या जागृत असणाऱ्या ग्रामपंचायतीमध्ये गेल्या पंचवार्षिकमध्ये सदस्य म्हणून निवडून आल्यानंतर पाच वर्षे स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ग्रामपंचायतीत गावासाठी करावयाची विकासकामे यांचा त्यांनी सखोल अभ्यास केला. पती योगेशजी पाटणकर यांची खंबीर साथ आणि मार्गदर्शनाखाली गावकऱ्यांच्या सुख दुःखात हिरीरीने आणि मनापासून सहभागी होणार्‍या महिला लोकप्रतिनिधी अशी ओळख त्यांनी कुंभारगाव आणि पंचक्रोशीत निर्माण केली. यातूनच यावर्षी पार पडलेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत गावकऱ्यांनी त्यांची उमेदवारी उत्स्फुर्तपणे उचलून धरली.



  माजी मुख्यमंत्री, आमदार पृथ्वीराज चव्हाण (बाबा) यांना आपले आदर्श आणि नेता मानणाऱ्या या पाटणकर दाम्पत्याने बाबांचे नेतृत्व मानणार्‍या पॅनेलमधून निवडणूक लढविणाऱ्या सौ. सारिका योगेश पाटणकर या मोठ्या मताधिक्याने निवडून तर आल्याच, पण ग्रामपंचायतीच्या उच्चशिक्षित महिला सरपंच म्हणून जबाबदारीही त्यांनी स्वीकारली. ग्रामपंचायत सदस्या म्हणून पाच वर्षे अत्यंत अभ्यासृवृत्तीने केलेल्या कामाच्या अनुभवाच्या शिदोरीमुळे जनतेच्या आशीर्वादाने त्यांना पाच वर्षांकरिता कुंभारगावच्या सरपंचपदी काम करण्याची संधी प्राप्त झाली आहे. ग्रामपंचायत स्तरावर आ. पृथ्वीराज चव्हाण आणि माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर यांचे नेतृत्व मानणार्‍या पॅनेलमधून विजयी होवून सरपंचपदाची धुरा स्विकारली. बी.ई. कम्प्युटर ही उच्च पदवी संपादन केलेल्या सरपंचांनी ग्रामपंचयतीचा कारभारही डिजिटल पध्दतीने सुरू करून कोरोना काळात नागरिकांना ग्रामपंचायतीच्या सोयी-सुविधा पुरविताना कोणतीही अडचण येणार नाही याकडे विशेष लक्ष दिले. व्हिडीओ कॉन्फ्रसिंगद्वारे ग्रामपंचयातमध्ये बसून पंचायत समिती, जिल्हा परिषदेसह अन्य अधिकाऱ्यांशी संपर्क साधून शासनाच्या योजना गावांत अधिक गतीने आणल्या.

उद्योगाच्या निमित्ताने कुंभारगावपासून दूर पुणे, मुंबईमध्ये स्थिरावले असतानाही योगेशजी आणि सौ. सारिका पटणकर यांनी आपल्या गावाशी, मातीशी असणारी नाळ कधीही तुटू दिली नाही, गावकऱ्यांच्या सुख-दु:खात सदैव सहभागी होत गावच्या संपर्कात राहण्याने आज गावच्या प्रथम नागरीक होण्याचा सन्मान त्यांना प्राप्त झाला. सासरे कै.जगन्नाथ पाटणकर यांचेकडून सामाजिक कार्याचे धडे मिळाले. म्हणूनच मी आज कौटुंबिक जबाबदारी सांभाळून राजकारण आणि समाजकारण यांची सांगड घालत सामाजिक सेवेचे व्रत सांभाळणार असल्याचे सरपंच सौ.सारीका पाटणकर यांनी सांगितले. कोरोनाच्या महाभयंकर आजाराबाबत त्यांनी कुंभारगांवच्या नागरिकांना जागृत तर केलेच, पण वेळेवर लसीकरण होईल याकडे विशेष लक्ष दिले. पिण्याच्या पाण्याची योजना योग्य प्रकारे कार्यान्वित करून स्वच्छ व शुध्द आणि मुबलक पाणी नागरिकांना कसे मिळेल याकडे त्यांचे लक्ष असते. गावातील प्राथमिक आणि माध्यमिक शाळेतील विद्यार्थी सध्याच्या कोव्हिड संकटात अभ्यासात मागे पडणार नाहीत, याची विशेष काळजी घेऊन त्यांच्या योग्य ऑनलाईन शिक्षणासाठी त्या प्रयत्नशील असतात. 

माजी केंद्रीय मंत्री कै.आनंदराव चव्हाण (काका), काँग्रेसच्या दिगज नेत्या कै. प्रेमलाताई चव्हाण (काकी) आणि महाराष्ट्राचे लोकप्रिय आणि कर्तबगार माजी मुख्यमंत्री आ.पृथ्वीराज चव्हाण (बाबा) यांचे कुंभारगाव हे मूळ गाव. हे नेतेगण राज्य आणि देशपातळीवर आपले कर्तृत्व सिद्ध करीत असताना त्यांच्या प्रतिमेचा उपयोग करून घेऊन विकास कामांबाबत कुंभारगांवला खुप पुढे घेऊन जाण्याची संधी होती. मात्र, या संधीचा यापूर्वी म्हणावा तितका उपयोग करून घेता आलेला नाही. मात्र, आता आपण बाबांच्या नेतृत्वाखाली कुंभारगांव विकास कामांबाबत अग्रस्थानी कसे असेल, यासाठी प्रामाणिक प्रयत्न करणार आहोत. फक्त कुंभारगांवच नाही, तर कुंभारगांव-काळगांव जिल्हा परिषद मतदार संघातील प्रत्येक गावातील अडीअडचणी सोडवून तिथे विकासाची गंगा आणण्यासाठी आमचा प्रयत्न राहील, असे सरपंच सौ.सारिका व श्री. योगेशजी पाटणकर यांनी सांगितले.

निराधार महिलांसाठी एक शाश्वत आधार केंद्र कुंभारगावात सुरू करून त्यांना आधार देऊन त्यांच्या दु:खावर फुंकर घालण्याचे काम करण्याचा मनोदय सौ.सारीका पाटणकर यांनी व्यक्त केला.

राज्याचे नेते आमदार पृथ्वीराज चव्हाण (बाबा), माजी मंत्री श्री. विक्रमसिंह पाटणकर (दादा), जिल्ह्याचे पालकमंत्री ना. बाळासाहेब पाटील, खा.श्रीनिवास पाटील, युवा नेते श्री. सत्यजितसिंह पाटणकर यांच्या आशीर्वाद, मार्गदर्शन आणि सहकार्य याच्या बळावर जनतेच्या आशीर्वादाने कुंभारगांवसह काळगांव - कुंभारगांव जिल्हा परिषद मतदारसंघात विकासकामे राबवून तेथील लोकांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी सदैव तत्परतेने उपलब्ध व कार्यरत राहू हा संकल्प वाढदिवसाच्या निमित्ताने करीत असल्याचे सरपंच सौ.सारिका योगेश पाटणकर आणि युवा उद्योजक सामाजिक कार्यकर्ते श्री.योगेशजी पाटणकर यांनी केला. 

सरपंच सौ.सारिका योगेश पाटणकर यांना दैनिक कृष्णाकाठ व कृष्णाकाठ परिवाराच्या वतीने वाढदिवसाच्या लक्ष लक्ष शुभेच्छा...