ग्रंथालय शास्त्राचे पितामह डॉ.एस.आर.रंगनाथन यांच्या जयंतीनिमित्त काकासाहेब चव्हाण कॉलेज तळमावले येथे एक दिवसीय राज्यस्तरीय वेबीनार IQAC & Dept. Of Library यांच्या संयुक्त विद्यमाने ऑनलाईन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
दरम्यान शैक्षणिक आणि संशोधनासाठी खुल्या संसाधनाचा प्रभावी वापर या विषयावर बोलण्यासाठी डॉ. एस.ए.एन. इनामदार (माजी ग्रंथपाल, वालचंद कॉलेज इंजिनिअरिंग सांगली ) यांना बोलावण्यात आले होते . त्यावेळी ते बोलताना म्हणाले ,पारंपरिक व डिजिटल ग्रंथालय यामध्ये भरपूर प्रमाणात फरक झाला आहे मुळातच आपल्या हिंदु धर्मात व संस्कृतीत ग्रंथाचे महत्त्व हे अनेक थोर संतानी, विचारवंतानी तसेच शास्त्रज्ञ्यांनी सांगितले आहे सुसंस्कृत समाज निर्मितीसाठी शालेय व महाविद्यालयीन शिक्षणाबरोबरच निरंतर शिक्षण देखील अत्यंत महत्त्वाचे आहे.ग्रंथालयाचा विकास प्रसार चांगल्या पध्दतीने होण्यासाठी या २१ व्या माहिती तंत्रज्ञानाच्या युगात (Digital Technology ) शतकात आपणास शैक्षणिक आणि संशोधनासाठी खुल्या संसाधनाचा (Open Resources ) प्रभावी वापर कसा झाला पाहिजे या संदर्भात वेगवेगळ्या संदर्भाची महिती सांगितले जसे कि - ई- संसाधने मानवाच्या आवश्यकता किंवा इच्छा पुर्ती करणारे वस्तू म्हणजेच ही नवीन इ संसाधने होय.डॉ रंगनाथन यांच्या पंचसूत्री चे महत्त्व विशद करण्यात आले तसेच इलेक्ट्रॉनिक मिडीयाच्या माध्यमातून आपणास प्रचंड प्रमाणात माहिती उपलब्ध होवू शकते एवढे तंत्रज्ञान पुढे गेले आहे.उदा.गुगलसर्च , ई- जर्नल्स , इमेज व वेब तंत्रज्ञानच्या साह्याने आपले ज्ञान वाढण्यास नेहमीच मदत होते.स्पर्धा परीक्षेसाठी कोणत्या वेबसाईटवर चा वापर करावा कोणते ग्रंथ ,पुस्तक हातळावीत अथवा वाचन करावीत ही देखील माहिती अत्यंत मोजक्या शब्दात व चांगल्या पध्दतीने आम्हा सर्वांना सांगितली गेली.त्यानंतर अध्यक्ष . प्राचार्य डॉ.अरुण गाडे यांनी देखील ग्रंथाचे महत्व , वेबसाईट, संदर्भ ग्रंथ कोणते वाचावेत .पुस्तक अथवा ग्रंथ वाचनाने आपल्या मनात व बुध्दीमध्ये प्रचंड प्रमाणात बदल घडवून आणला जातो तसेच सुसंस्काराचे धडे सुध्दा आपणास समजण्यास सोपे जाते. अशा पध्दतीने त्यांनी आपले अध्यक्ष मनोगत थोडक्यात व्यक्त केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा डॉ जे यु मुल्ला यांनी केले, सुत्रसंचालन प्रा. सचिन पुजारी यांनी केले तसेच आभार प्रा.महेश चव्हाण यांनी केले या कार्यक्रमास आजी - माजी विद्यार्थी , प्राध्यापक , संशोधक उपस्थित होते.