तळमावले | राजेंद्र पुजारी :
पाटण तालुक्यातील कुंभारगाव विभागात वळवाच्या पावसाने दडी मारली होती, मार्च महिन्या नंतर पाण्याचे ओढे, नाले आटले होते .अनेक हेक्टर शेती बागायत , उसाची शेती ओढ्याच्या पाण्यावर अवलंबून असून ऐन मार्च महिन्यात ओढ्याचे पाणी कमी झाल्याने येथील शेतकरी चिंताग्रस्त झाले होते. मागील दोन दिवसापासून अवकाळी वळवाच्या पाऊसाने या विभागात दमदार हजेरी लावली काल या पावसाने कहरच केला गलमेवाडी, शेंडेवाडी येथे 60 मिनिटे ढगफुटी प्रमाणे पाऊस कोसळला , व अक्षरशः ओढयावरील सर्व बंधारे ओहरफ्लो ओसंडून पाण्याने वाहू लागले. यामुळे शेतकऱ्याच्या चेहऱ्यावर आनंद दिसत आहे, आता मान्सून पूर्व शेतीच्या कामाला वेग येण्याचे या विभागात चित्र आहे.