ढेबेवाडी/प्रतिनिधी :
समाजात जातीभेद व धर्मांधता पसरवून समाजाचे धोकादायक विघटन केले जात आहे. त्या पार्श्वभूमीवर विलासकाका यांनी आपल्या 50 वर्षाच्या राजकीय जीवनात काँग्रेसच्या राष्ट्रीय विचाराचे बिजारोपण करून ते समाजात जोपासले तेच काँग्रेसचे राष्ट्रीय विचार घेऊन चालणे गरजेचे आहे याच विचारातून काँग्रेस अंतर्गत असलेल्या दोन गटातील मतभेद संपवून एकत्रीकरण होत आहे.असे प्रतिपादन जि.प.सदस्य रयत संघटनेचे युवा नेते अॅड. उदयसिंह पाटील यांनी केले.
कोजागिरी पौर्णिमेच्या पार्श्वभूमीवर प्रतिवर्षी भरणाऱ्या रयत संघटनेच्या मेळाव्याचे मोजक्या कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत कोयना दुध सघावर आयोजन केले होते त्या मेळाव्यात उपस्थितत प्रमुख कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करतांना ते बोलत होते.मेळाव्याला कराड ख.वि.संघ,कोयना बँक,बाजार समिती,रयत साखर कारखाना,
शामराव पाटील पतसंस्था व विविध संस्थांचे पदाधिकारी,संचालक व तालुक्यातील प्रमुख कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.
पुढे बोलतांना ते म्हणाले की काँग्रेसच्या दोन्ही गटांचे एकत्रीकरण होत असतांना कोणत्याही पदाची अपेक्षा न ठेवता होत आहे आणि कार्यकर्त्यानीही तशा अपेक्षा व्यक्त करू नयेत. ज्यानी संघटना निर्माण करून ती वाढविली,जोपासली त्यांचाच भार आपण आपल्या खांद्यावर घेऊन चालायचे आहे, राष्ट्रीय विचाराची ताकद मिळाल्यावरआपण जिल्ह्यात मोठे नेटवर्क निर्माण करू शकतो मात्र या घडामोडीमुळे अनेकजण अस्वस्थ होणार आहेत,या विचारापासून तुम्हाला विचलीत करण्याचा प्रयत्न होईल मात्र आपण अशा प्रवृती पासून सावध रहावे.
प्रा.धनाजी काटकर यांनी सर्वांचे स्वागत करून प्रास्ताविक केले, कोयना दुध संघाचे अध्यक्ष वसंतराव जगदाळे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. जि.प.सदस्य प्रदिपदादा यांनी आभार मानले.
------------------------------------------काँग्रेसचे राज्य अध्यक्ष व महसूलमंत्री ना. बाळासाहेब थोरात,आम.पृथ्वीराज चव्हाण, माजीमंत्री विलासकाका यांच्या उपस्थितीत मोजक्या कार्यकर्त्यांचा मेळावा होऊन दि.5,6,किंवा 7 नोव्हे.रोजी दोन्ही गट एकत्र येत आहेत.
धनाजी काटकर
रयत संघटना पदाधिकारी
------------------------------------------
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीत उदयसिंह पाटील यांच्यावर महत्वाच्या पदाची जबाबदारी सोपविण्यात येणार आहे. त्यातून मिळणाऱ्या पक्षीय बळावर जिल्ह्यात काँग्रेस बळकट करण्याचे कामकरायचेआहे.
------------------------------------------