एक प्रगतशील शेतकरी, एक आदर्श माता व एक दानशूर व्यक्तिमत्व हरपले.
तळमावले दि. :
गुढे (शिबेवाडी )तालुका पाटण येथील कै. श्रीमती. अनुसया रामचंद्र शिबे यांचे हृदयविकाराने निधन झाले .
"जो आवडे सर्वांना तोची आवडे देवाला" या उक्तीप्रमाणे सामाजिक कार्यात सहभागी असणाऱ्या, वयाची नव्वदी पार करून सुद्धा उत्तम आरोग्य सांभाळणाऱ्या, शेवटच्या श्वासापर्यंत आपले काम करत असणाऱ्या, तीन मुले व तीन मुली असा मोठा परिवार असून सुद्धा सर्व परिवार गोकुळा प्रमाणे राहत असे. सर्व परिवार एकसंघ बांधून ठेवणाऱ्या, स्वतः अशिक्षित असून सुद्धा सुसंस्काराची बीजे पेरणाऱ्या व संस्कारक्षम पिढी घडवणाऱ्या पुरोगामी विचारांच्या असूनही आपले कुटुंब व समाज शिक्षित झाला पाहिजे या ध्येयाने सातत्याने प्रयत्नशील असणाऱ्या एक आदर्श माता
गुढे (शिबेवाडी) ता.पाटण गांवच्या प्रगतशील शेतकरी कै. श्रीमती.अनुसया रामचंद्र शिबे यांचे बुधवार दिनांक ०९/०९/२०२० रोजी हृदयविकाराने वयाच्या ९१ व्या वर्षी निधन झाले. त्या स्वभावाने अत्यंत मायाळू होत्या. गोरगरिबांना सढळ हाताने मदत करीत असत.
त्या आपल्या शेतीमध्ये नव नवीन प्रयोग करीत असत. त्यांचा शेती म्हणजे श्वास असे त्यांना शेतीची खूप आवड होती. त्या नव नवीन बियाणे सोबत देशी वाणाच्या बियाण्याचे जतन करून ठेवत असे. गोरगरिबांना सदैव मदतीचा हात देणाऱ्या. एक समाजप्रिय, दानशूर असे एक हक्काचे माणूस गेल्याने गुढे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
त्यांच्या पश्यात तीन मुलगे व तीन मुली सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे.
त्या खरेदी विक्री संघ लि. पाटण चे संचालक अरविंद रामचंद्र शिबे यांच्या मातोश्री आहेत.
सोमवार दिनांक 21/ सप्टेंबर 2020 रोजी सकाळी त्यांच्या राहत्या घरी त्यांचा उत्तरकार्य विधी होणार आहे.
त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
दैनिक कृष्णाकाठ व कृष्णाकाठ परिवाराच्या वतीने त्यांना शब्द फुलांची भावपूर्ण श्रद्धांजली.