एकीचे बळ : साळशिंरबे तालुका कराड येथील ग्रामस्थांनीच ऑक्सिजन मशिन आणल्या; गरजूंना मोफत सेवा
उंडाळे दि. : व्हॉट्सऍप ग्रुपवरून केलेल्या मदतीच्या आवाहनाला ग्रामस्थांकडून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला.
दिवसेंदिवस कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने शहरातील हॉस्पिटलमध्ये बेड व ऑक्सिजनची कमतरता भासत असल्याने अनेकांचा बळी जात आहे. या पार्श्वभूमीवर साळशिंरबे तालुका कराड येथील ग्रामस्थांनी एकत्र येऊन गावच्या हितासाठी लोकसहभागातून ऑक्सिजन मशिन खरेदी केल्या आहेत.
सध्या जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढतच आहे. ग्रामीण भागातूनही रुग्णसंख्या वाढल्यामुळे प्रशासन, आरोग्य विभागावर ताण येत आहे. या पार्श्वभूमीवर साळशिंरबे ग्रामस्थांनी भविष्यातील धोका ओळखून तो काही प्रमाणात कमी करण्यासाठी गावातील सामाजिक कार्यकर्ते, ग्रामस्थ, युवक, गणेश मंडळे, पुणे-मुंबईस्थित युवकांनी व्हॉट्सऍप ग्रुपवर एकत्र येऊन ऑक्सिजन मशिन खरेदीसाठी स्वेच्छेने लोकवर्गणी देण्याचे आवाहन केले होते.
या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद मिळाला साळशिरंबे गावातील थोर देणगीदारांच्या विशेष सहकार्याने गावासाठी पोर्टेबल आॅक्सिजन किट व प्लस आँक्सिमिटर , टेम्प्रेचर मिटर ...या अत्यावश्यक मशीन खरेदी केल्या आहेत. आता गरजुंना व आजारी व्यक्तींना मिळणार मोफत सेवा... या मशिन गरजू रुग्णांना गरजेच्यावेळी मोफत देण्यात येणार आहेत. . येथील ग्रामस्थांनी दाखवलेल्या एकजुटीचे परिसरातून कौतुक होत आहे.
या गावचा आदर्श घेऊन तालुक्यातील सर्वच गावे वाड्यावर त्यांनी अशा प्रकारचा उपक्रम केला तर प्रत्येक गावातील गरजूंना संकट काळात त्यांच्या आरोग्यासाठी चांगली मदत होऊ शकते.