सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री कोरोना बाधित.


 


सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री कोरोना बाधित.


कराड / प्रतिनिधी :


जगभरासह देश कोरोनावर मात करण्यासाठी झुंजत असताना मंत्र्याना कोरोनाची बाधा होण्याचे प्रकार सुरूच आहेत. आता राज्यातल्या या बड्या मंत्र्याला कोरोनाची बाधा झाल्याचे समोर आले आहे.


सहकार व पणन मंत्री तसेच सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.आज 15 ऑगस्टच्या स्वातंत्र्यदिनी ही माहिती समोर आल्याने जिल्ह्यात एकच खळबळ माजली आहे.


पालकमंत्री पाटील यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सातत्याने अधिकाऱ्यांच्या बैठका घेऊन प्रशासन अलर्ट ठेवण्याचे काम संकट काळात केले आहे. 


दरम्यान आज ना.बाळासाहेब पाटील यांना कराडच्या कृष्णा हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.