शेणोली स्टेशन येथील 7 जणांसह एकूण 18 कोरोनामुक्त रूग्णांना कृष्णा हॉस्पिटलमधून डिस्चार्ज.

 


 


 



शेणोली स्टेशन येथील 7 जणांसह एकूण 18 कोरोनामुक्त रूग्णांना कृष्णा हॉस्पिटलमधून डिस्चार्ज


 


कराड, ता. 8 : कराड तालुक्यातील शेणोली स्टेशन येथील 7, म्हासोली येथील 3, वानरवाडी येथील 3, करपेवाडी, तामिनी-पाटण, साकुर्डी, सदुर्पेवाडी आणि गलमेवाडी येथील प्रत्येकी 1 अशा एकूण 18 कोरोनामुक्त रूग्णांना आज कृष्णा हॉस्पिटलमधून टाळ्यांच्या गजरात डिस्चार्ज देण्यात आला. आत्तापर्यंत कृष्णा हॉस्पिटलमधून एकूण 162 कोरोनामुक्त रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. 


 


कराड तालुक्यातील शेणोली स्टेशन येथील 36 वर्षीय पुरूष, 28 वर्षीय पुरूष, 26 वर्षीय महिला, 34 वर्षीय पुरूष, 24 वर्षीय युवक, 7 वर्षीय मुलगी, 13 वर्षीय मुलगी, म्हासोली येथील 15 वर्षीय मुलगा, 14 वर्षीय मुलगा, 12 वर्षीय मुलगा, वानरवाडी येथील 40 वर्षीय पुरूष, 17 वर्षीय मुलगा, 29 वर्षीय मुलगा, करपेवाडी येथील येथील 16 वर्षीय मुलगा, कामिनी-पाटण येथील 25 वर्षीय युवती, साकुर्डी येथील 27 वर्षीय युवक, सदुर्पेवाडी येथील 4 वर्षीय मुलगी, गलमेवाडी येथील 12 वर्षीय मुलगी हे रूग्ण गेले काही दिवस कृष्णा हॉस्पिटलच्या कोरोना विशेष वार्डमध्ये उपचार घेत होते. त्यांचे उपचारनंतरचे अहवाल निगेटीव्ह आल्याने आज त्यांना टाळ्यांच्या गजरात डिस्चार्ज देण्यात आला.



यावेळी तहसीलदार अमरदीप वाकडे, कृष्णा चॅरिटेबल ट्रस्टचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. संगीता देशमुख, प्रसुतीरोग तज्ज्ञ डॉ. एन. एस. क्षीरसागर, डॉ. अमोल गौतम, डॉ. अर्चना रोकडे, डॉ. दिग्विजय कदम, डॉ. अश्वती विश्वनाथ, डॉ. विनीत चौधरी, डॉ. श्रद्धा शेटे, डॉ. सुशील घारगे, डॉ. स्तुती उगीले, डॉ. आशुतोष बंडगर, डॉ. अनिकेत सुरुशे यांच्या हस्ते कोरोनामुक्त रूग्णांचा पुष्पगुच्छ व प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला. 


 


याप्रसंगी कृष्णा हॉस्पिटलचे वैद्यकीय संचालक ए. वाय. क्षीरसागर, कृष्णा अभिमत विद्यापीठाचे सहाय्यक कुलसचिव एस. ए. माशाळकर, डॉ. संजय पाटील, डॉ. व्ही. सी. पाटील, डॉ. एस. आर. पाटील, रोहिणी बाबर यांच्यासह हॉस्पिटलचा अन्य स्टाफ उपस्थित होता.