येळगाव मध्ये शेटे परिवाराकडून गरजूंना जीवनावश्यक साहित्याचे वाटप. 

 


येळगाव मध्ये शेटे परिवाराकडून गरजूंना जीवनावश्यक साहित्याचे वाटप. 


याळगाव / प्रतिनिधी: प्रशांत शेवाळे


येळगावचे सुपुत्र नवी मुंबईचे युवा नेते अमित (आबा) शेटे , माजी सरपंच सुचिता रमेश शेटे व मुक्ताई एटरप्रायझेस चे संदीप शेटे यांच्या वतीने कै. बाळासाहेब महादेव शेटे यांच्या स्मरणार्थ कोरोना च्या पार्श्वभूमीवर आपल्या मातृभूमीतील गोरगरीब, मजूर यांची गरज ओळखून त्यांना मदत करण्याचा निर्णय घेतला. गावातील गरजू कुटुंबाची गल्लीवार  निवड  करून ज्यांना मदतीची गरज आहे अशा कुटुंबाना किमान 15 दिवस पुरेल असे जीवनावश्यक साहित्य ज्यामध्ये तेल, डाळ, गहू  आट्टा, चहा, साखर आंघोळीचे साबण, कपड्याचे  साबण या वस्तूंचे किट बनवले. त्याचे वितरण शेटे परिवार  संदीप शेटे, विराज शेटे, ऋतुराज शेटे, संग्राम शेटे, महेंद्र जंगम, शिवछत्रपती प्रतिष्ठानचे कार्यकर्ते यांनी केले. सुरक्षिततेच्या सर्व उपाय योजनांचा आदर राखत गरजू कुटुंबाना मदतीचे वितरण केले. या स्तुत्य उपक्रमाबद्धल येळगावकर ग्रामस्थांनी युवा नेते अमित(आबा) शेटे व परिवाराचे अभिनंदन केले