कोविड - १९  म्हणजे कोरोना  विषाणूला हरवुया, महाराष्ट्राला जिंकुया.. 


कोविड - १९  म्हणजे कोरोना  विषाणूला हरवुया, महाराष्ट्राला जिंकुया.. 
भारतात कोविड -१९ च्या  महाभयंकर विषाणू ने फैलाव केला आहे त्यामुळे भारत सरकारने व महाराष्ट्र राज्य सरकारच्या संयुक्त विद्यमानाने  पुर्णपणे @ Lockdown @ केल्या पासून सर्व सामान्य माणसाच्या  जीवनाची घडी बिघडली आहे.या परिस्थितीत काय करायचे व काय नाही या गंभीर प्रश्नाने सर्वांना कोड्यात टाकले आहे परंतु या गंभीर COVID 19 च्या विषाणुला हारविण्यासाठी सरकारने आपल्याला @ Stay at Home & Safe @ ची घोषणा केली व सर्व नागरिक ज्या परिस्थितीत आहेत त्या परिस्थिती सर्वजण घरात राहुन या विषाणूला हारविण्यासाठी सर्वांनी प्रतिज्ञा केली आहे. परंतु आता ची परिस्थिती नाजुक  झाली आहे या वातावरणात आपल्या मनाला आनंद वाटणारी गोष्ट प्रत्येकांने  करणे गरजेची आहे मला म्हणावसे वाटते कि - " मन करारे प्रसन्न , सर्व सिध्दीचे कारण " या उक्तीप्रमाणे  आपण पुढील पैकी - वाचन करणे , संगीत ऐकणे , गाणी गाणे ,लेखन करणे , नातेवाईकांशी फोन करून गप्पा मारणे , कुटुंबातील आई -  वडील, आजी -  आजोबांशी संवाद साधने, फिल्म व नाटक पाहणे , यापैकी आपण कोणतीह गोष्ट करावी.या विषाणूमुळे  माणूस माणसात राहिला नाही, माणसाची आर्थिक स्थिती कितीही चांगली असली तरी ,जीवनाचा खरा आनंद घेण्यासाठी त्यांची मनस्थिती चांगली असावी लागते .म्हणून नेहमी आनंदीत राहले व जगले पाहिजे तसेच दुसऱ्यांना देखील आनंदीत ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे . 
👉मी स्वत:च्या मनाला आनंदी ठेवण्यासाठी  Lockdown मध्ये 👉📖📖 वाचनाचा छंद जोपासला 📖 📖 👈 , वाचनाने माणसाच्या मनाचे परिवर्तन होते व माणसांच्या ज्ञानामध्ये वाढ होवून माणसाची प्रगल्भता वाढते. स्वतःच्या व्यक्तीमत्वार पुस्तकांचा प्रभाव पडतो . म्हणून तर विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर म्हणतात कि - वाचाल तर वाचाल,   पुस्तक व ग्रंथ वाचनामुळे आनेकांच्या जीवनात बदल व क्रांती झालेली दिसुन आली आहे.या लॉकडाऊन च्या वेळात आनेक व्यक्तीमत्वांची चरित्रे, कथा , कादंबरी , धार्मिक पुस्तके , छान छान गोष्टीची पुस्तके वाचून काढली.
@" येणारी प्रत्येक वादळे व वेळ ही आपल्याला उध्वस्त करण्यासाठी नसातात ....तर आपण काय आहोत याची जाणीव करून देण्यासाठी असतात.त्याच प्रमाणे 
@ " अंधारात चालताना प्राकाशाची गरज असते, उन्हात चालताना सावलीची गरज असते, आणि या कोरोना - १९ च्या महाभंयकर संकटात व या Lockdown मध्ये  जीवन जगत असताना चांगल्या माणसाची , गोष्टीची , वचनाची ,विचारांची गरज असते ..."@ या संकटाला घाबरून जाण्याची गरज नाही कारण - संकट येणे म्हणजे ' Part Of Life ' आणि त्या संकटाना हसत हसत व सकारात्मक सामोरे जाऊन बाहेर पडंण म्हणजे ' Art Of Life' होय. शेवटी मला सुरेश भट्ट यांच्या ओळी आठवतात - 
@ आयुष्य छान आहे थोडे लहान आहे ! रडतोस काय वेड्या ? लढण्यात शान आहे ! काट्यातही फुलांची झुलती कमान आहे ! उचलुन घे हवे ते , दुनिया दुकान आहे ! सुखासाठी कधी हसावं लागत ,तर कधी रडावं लागत !, कारण सुदंर धबधबा बनायला पाण्यालाही उंचावरून पडावं लागतं !."@ या कोरोना च्या पार्श्वभूमी वर थोडासा विचार मांडण्याचा प्रयत्न केला आहे , काही चुकले असेल तर ते माझे समजावे व जे बरोबर आहे ते सर्व आपले आहे असे समजावे .शेवटी मला  ऐवढीच प्रार्थना करावयाची वाटते कि, 
 @" इतनी शक्ती हमे देन दाता , मनका विश्वास कमजोर ना होना".@ या प्रचंड विश्वासावर -  आज १ मे २०२० शुक्रवार रोजी महाराष्ट्र व कामगार दिनाच्या औचित्यांने अशी प्रतिज्ञा व मनपुर्वक प्रार्थना करुया कि , -  आपल्या भारतावर व महाराष्ट्रावर आलेल्या कोरोनाच्या संकटाला हारवुया व भारताला व महाराष्ट्राला जिंकुया.. !!! 
जय हिंद ,जय भारत,जय बापुजी. @ Stay at Home & Safe @ 


प्रा सचिन पुजारी (सर) - काकासाहेब चव्हाण कॉले,तळमावले व सचिव, संजिवन प्रतिष्ठान कुंभारगाव ता पाटण..