कराड येथील विलगिकरण कक्षातील बालकाचा जंतू संसर्गाने मृत्यू.


सातारा :  दि. 3 एप्रिल रोजी सातारा जिल्हा रुग्णालय येथे दाखल असणाऱ्या 4 अनुमानित व सातारा येथील खासगी दवाखान्यात दाखल असणार एक असे एकूण 5 रुग्णांचे कोरोना रिपोर्ट एन. आय. व्ही. पुणे यांनी निगेटिव्ह असल्याचे कळविले आहे. आज रोजी सातारा जिल्हा रुग्णालयात श्वसन संस्थेच्या तीव्र जंतु संसर्गामुळे 24 वर्षीय पुरुष तर कृष्णा हॉस्पिटल कऱ्हाड येथे बाधीत रुग्णाच्या सहवासीत म्हणून 2 नागरिक व श्वसन संस्थेच्या तीव्र जंतू संसर्गामुळे एक नऊ महिन्याचे स्त्री जातीचे बाळ विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले आहे. या सर्व चार रुग्णांच्या घशातील स्त्राव पुणे एन. आय. व्ही. येथे पाठविण्यात आलेले आहेत. यापैकी नऊ महिने बाळाचा मृत्यू झाला असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी सांगितले आहे.