उंडाळे प्रतिनिधी
मंगळवारी रात्री तीन ते साडेतीन वाजण्याच्या सुमारास लटकेवाडी डोंगर जंगल परिसरातून वसंत आनंदा चव्हाण यांनी त्यांच्या घराच्या पाठीमागे जनावरांसाठी निवारा करून त्यात आपली जनावरे बांधली होती या जनावरावर राञी साडेतीन दरम्यान डोंगर परिसरातील राखीव जंगल परिसरातून बिबट्याने निवारा केलेल्या जनावरांच्या शेडमध्ये बांधलेल्या जनावरावर अचानक हल्ला केला यामध्ये बिबट्याने प्रथम लहान म्हैस( रेडकू) वर हल्ला केला बिबट्याने रेडकाचा गळा पकडला हा गळा पकडल्यानंतर जनावरे धडपडू लागली तेव्हा बिबट्याने रेडकू सोडून म्हैशीवर हल्ला केला या हल्ल्यात दोन्ही जनावरे गंभीर जखमी झाली
उकाड्यामुळे जनावरांच्या नजीक वसंत चव्हाण हे बाहेरच झोपले होते जनावरे का धडपडत आहेत हे पाहण्यासाठी त्यांनी बाहेरील लाईट लावली तेव्हा जनावरावर हल्ला करणारा व रेडकाचा गळा तोंडात पकडलेल्या बिबट्याने माणसाची चाहूल लागताच त्याने तेथून डोंगर भागात पळ काढला तोपर्यंत बिबट्या व जनावरांमध्ये चांगलीच झटपट झाली व दोन्ही जनावरे गंभीर जखामी झाली
या प्रकाराने लटकेवाडी परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून सातत्याने लटकेवाडीत बिबट्या जनावरांच्यावर हल्ला करत असून या बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.