येळगावात शिवप्रतिष्ठानच्या वतीने घरोघरी मास्कचे वाटप.


येळगावकरांची अशी ही सामाजिक बांधिलकी. इतर गावांनी आदर्श घ्यावा.


कराड: 
येळगांव ता.कराड येथील शिवछत्रपती प्रतिष्ठानने केलेल्या आवाहनास गावातील देणगीदार, टेलर यांनी उस्फूर्त प्रतिसाद दिल्याने सुमारे अडीच हजार मास्क तयार झाले .सदर मास्क गावातील घरोघरी वाटप करण्यात आले.प्रतिष्ठानच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
       याबाबत अधिक माहीती अशी की,कोरोनाच्या महाभयंकर साथीचा फैलाव ग्रामीण भागातही वाढू लागलाय तो थोपवण्यासाठी घरात थांबणे हा महत्वाचा उपाय आहे .मात्र जीवनावश्यक बाबींसाठी ग्रामस्थांना घराबाहेर पडावे लागत आहे.अशावेळी तोंडाला मास्क लावणे आवश्यक आहे.परंतु सध्याची परस्थिती पहाता सर्वत्र मास्कची कमतरता भासू लागली आहे अनेक ठिकाणी त्याचा काळाबाजार झाल्याच्या घटनाही समोर आल्या आहेत. या सर्व घडामोडी पहाता गावकर्यांना पुरेसे मास्क मिळावेत व त्यांच्या आरोग्याचे ऱक्षण व्हावे यासाठी शिवछत्रपती प्रतिष्ठानने गावकर्यांना मोफत मास्क पुरविण्याचा निर्णय घेतला.त्यासाठी गावातीलच देणगीदारांना कापड देण्याचे तर शिलाई काम करणारांना ते मोफत शिवून देण्याचे आवाहन करण्यात आले. त्याला गावातील देणगीदारांचा उस्फूर्त प्रतिसाद मिळाला. कापड व्यापारी अमित ओसवाल यांनी सढळ हस्ते या सामाजिक कार्यासाठी संपूर्ण कापड दिले तर गावातील शिलाई काम करणाऱ्या महिला राणी साळूंखे,अस्मिता आलटकर,तेजश्री पांगे सुनंदा पाटील, माधवी माने, सुरेखा पाटील रोहीणी पांगे, मेघा माने , उज्वला माने, साधना माने, सुनिता साळू्खे, शोभा येळवे, अनिता येळवे,  दिपाली शेटे, सीमा पाटील ,वैशाली पाटील, शिंदेताई या महीला भगिनींसह ग्रामस्थ महादेव साळूंखे गुरूजी, दत्तात्रय तेली यांनी मास्क शिवून दिले.


प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी सर्व मास्क एकत्र करून निर्जंतूकीकरण करून घरोघरी वाटप केले यासाठी माजी सरपंच सुचिता शेटे , रमेश शेटे अध्यक्ष प्रशांत शेवाळे, झुंजार पाटील यासह कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.