सातारा दि.26 (जिमाका) : राज्यात कोरोना विषाणूमुळे उद्भवणाऱ्या संसर्गजन्य आजारामुळे उपविभागीय दंडाधिकारी तथा इन्सिडंट कमांडर, सातारा उपविभाग, सातारा यांनी सातारा शहरातील वाहतुक व्यवस्थेमध्ये पुढील प्रमाणे बदल केले आहेत.
सातारा शहरामध्ये येणारे सर्व मुख्य व इतर रस्त्यांमध्ये बदल करण्यात येत असून, त्यामध्ये सातारा शहरामध्ये कोरेगाव सातारा या रोडवरील बॉम्बे रेस्टॉरंट चौक व मेढारोड वरील मोळाचा ओढा येथून फक्त वाहने शहरात येणास व बाहेर जाण्यास परवानगी देण्यात येणार आहे. त्याव्यतीरिक्त सातारा शहरामध्ये येणारे इतर सर्व मुख्य रस्ते व इतर आत येणारे छाटे-छोटे रस्ते पुढील आदेशापर्यंत सातारा शहरात प्रवेश करण्यास व शहरातून बाहेर पडण्यास बंद करण्यात येत आहे.
तसेच लॉकडाऊनच्या कालावधीमध्ये अत्यावश्यक सेवा वगळून विनाकारण फिरत असलेल्या दुचाकी व चारचाकी वाहनांवर तसेच विनामास्क फिरणाऱ्या व्यक्तींवर नियमाप्रमाणे योग्य ती कडक कारवाई करण्याचेही उपविभागीय दंडाधिकारी तथा इन्सिडंट कमांडर, सातारा उपविभाग, सातारा यांनी सांगितले आहे.
कोरोना विषाणूमुळे उद्भवणाऱ्या संसर्गजन्य आजारामुळे सातारा शहरातील वाहतुक व्यवस्थेमध्ये बदल