‘शिवसमर्थ’ची मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी ‘लाख’ मोलाची मदत .


तळमावले/संदीप डाकवे
पाटण तालुक्यातील तळमावले येथील दि शिवसमर्थ मल्टी.को.आॅप.क्रे.सोसा.लि;व शिवसमर्थ परिवार यांच्यावतीने मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी 1 लाखाचा धनादेश संस्थेचे संस्थापक/अध्यक्ष अॅड.जनार्दन बोत्रे यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली संस्थेचे उपमहाव्यव्स्थापक हेमंत तुपे व सहकारी यांनी पाटणचे प्रातांधिकारी श्रीरंग तांबे, तहसिलदार समीर यादव यांचेकडे सुपूर्द केला. यावेळी पाटण तालुका पोलीस स्टेशनचे डीवायएसपी अशोक थोरात, पाटण तालुका पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी मीना साळुंखे, तालुका वैद्यकीय अधिकारी आर.बी.पाटील व अन्य मान्यवर उपस्थित होते. विशेष म्हणजे पाटण तालुक्यातून कोरोना साठी केली गेलेली ही पहिली मदत आहे. ‘‘सामथ्र्य आहे चळवळीचे, जे जो करील तयाचे’’ या ब्रीद वाक्यानुसार 15 आॅगस्ट, 2006 पासून आर्थिक सेवा देत विविध समाजोपयोगी उपक्रम राबवत आहे.
कोरोनाने देशासह राज्यात थैमान घातले आहे. या विषाणूवर नियंत्रण आणण्यासाठी अनेकजण युध्दपातळीवर प्रयत्न करत आहेत. असे असताना संशयीत व बाधीत रुग्णांवर सुरु असलेले वैद्यकीय उपचार, औषध पुरवठा, गरिबांसाठी आवश्यक अन्न पुरवठा, अत्यावश्यक वैद्यकीय सेवासुविधा तातडीने उभारणी आदी बाबींसाठी मोठया आर्थिक तरतुदींची आवश्यकता आहे. यासाठी समाजातील दानशूर व्यक्ती, सहकारी संस्था, सामाजिक संघटना यांनी आर्थिक मदत करावी असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री उध्दव ठाकरे व प्रशासनाने केले आहे. या आवाहनाला प्रतिसाद देत दि शिवसमर्थ मल्टी.को.आॅप.क्रे.सोसा.लि;तळमावले व शिवसमर्थ परिवार यांच्यावतीने मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी 1 लाखाचा धनादेश देण्यात आला आहे.
याशिवाय संस्थेने ग्रामीण भागामध्ये आतापर्यंत सुमारे 5 हजार मास्कचे वाटप केले असून 1 लाख मास्क वाटप करणार आहेत. तसेच प्रशासनाने कोरोना प्रतिबंधासाठी सांगितलेल्या मार्गदर्शक तत्त्वांचा प्रसार करणारी दर्जेदार व्हिडीओ क्लीप तयार करुन ती सोशल मिडीया, स्थानिक चॅनेलवर प्रसारित केली आहे.  याशिवाय प्रत्येक नैसर्गिक आपत्तीत शिवसमर्थ संस्था आणि परिवार नेहमी अग्रेसर असतो.  संस्थेच्या या सामाजिक बांधिलकीचे समाजाच्या विविध स्तरांतून कौतुक होत आहे.


◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾
प्रषासनाला सहकार्य करावे:
दि शिवसमर्थ मल्टी.को.आॅप.क्रे.सोसा.लि;तळमावले व शिवसमर्थ परिवार यांच्यावतीने देण्यात आलेल्या मदतीचा आदर्श घेत समाजातील दानशूर व्यक्ती, संस्था यांनीही प्रशासनाला मदत करावी. तसेच संस्थेच्या माध्यमातून प्रशासनाला जेवढे काही सहकार्य करता येईल यासाठी संस्था नेहमी पुढे आहे, असे मत संस्थेेचे संस्थापक अध्यक्ष अॅड.जनार्दन बोत्रे यांनी केले आहे.


मास्कची निर्मिती:
गरजू व होतकरु महिलांना घरबसल्या काम मिळावे या दृष्टीकोनातून स्थानिक महिलांच्या कडून मास्क बनवून घेत त्यांचे ग्रामीण भागात वितरण करण्यात आले आहे.


◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾