सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून 1 कोटीची मुख्यमंत्री सहाय्यतानिधीस मदत.सहकार मंत्री व जिल्हाधिकाऱ्यांनी संयुक्तरित्या स्वीकारला धनाकर्ष.
सातारा दि.20 (जि.माका) : कोरोनाच्या संसर्गावर मात करण्यासाठी राज्यातील सहकारी संस्थांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीला मदत करावी, असे आवाहन राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व सहकार व पणन मंत्री तथा पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने 1 कोटीचा धनाकर्ष (डी.डी.) मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी देण्यात आला.
हा 1 कोटीचा धनाकर्ष आमदार मरकंद पाटील यांच्या हस्ते सहकार व पणन मंत्री तथा पालकमंत्री बाळासाहेब पाटील व जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी संयुक्तीकरित्या स्वीकारला. यावेळी बँकेचे संचालक माजी आमदार प्रभाकर घार्गे, सुनिल माने, जिल्हा उपनिबंधक प्रकाश आष्टेकर, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे व्यवस्थापकीय संचालक राजेंद्र सरकाळे आदी उपस्थित होते.
कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी राज्य शासनामार्फत सुरु असलेल्या उपाययोजना सामाजिक बांधिलकी म्हणून सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमार्फत आज 1 कोटीचा धनाकर्ष (डी.डी.) मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी देण्यात आला.
कोरोनाच्या संसर्गाच्या संकटावर मात करण्यासाठी राज्यातील सहकारी संस्थांनी पुढे येऊन जास्तीत जास्त निधी मुख्यमंत्री सहाय्यता निधीस द्यावा, असे आवाहन सहकार व पणन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी यावेळी केले.