तळमावले /वार्ताहर
भारत देशामधील कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे दि.25 मार्च 2020 पासून केंद्रशासनाने 21 दिवस संपूर्ण देशामध्ये लाॅकडाऊन लागू केले आहे. सदर आदेशानुसार देशातील बॅंका चालू ठेवण्यात याव्यात असे निर्देश देण्यात आले आहेत. तथापि सदर आदेशामध्ये राज्यातील पतसंस्थांचा समावेश नाही. पतसंस्था याही वित्तीय संस्था आहेत. तथापि पोलिस प्रशासनाकडून संस्थेमध्ये जाण्यास कर्मचाÚयांना मज्जाव करण्यात येत आहे. असे दिसून येते. काही अपवाद वगळता प्रशासनाकडून सहकार्य मिळत आहे.
लाॅकडाऊन मुळे ‘गडया आपला गावच बरा’ असे म्हणत बहुतांशी मंडळी आहे त्या परिस्थितीत गावी परतली आहेत. ग्रामीण भागामध्ये मोठी गावे वगळता बॅंका नाहीत. तसेच लाॅक डाऊन मुळे लोकांना इतरत्र जाताही येत नाही. त्यामुळे लोकांना पतसंस्था, मल्टीस्टेट सोसायटी यामधून पैसे काढण्याशिवाय पर्याय नाही. ग्रामीण भागातील लोकांचे पैसे हे पतसंस्थामध्येच आहेत. त्यामुळे त्यांच्या दैनंदिन गरजा भागवण्यासाठी, दवाखान्यासाठी त्यांना पतसंस्था शिवाय पर्याय नाही. यासाठी पतसंस्था चालू असाव्यात अशी मागणी ग्रामीण भागातील लोकांकडून होत आहे.
कारण मुंबईहून आलेली लोकं ही आहे त्या परिस्थितीत आली आहेत. तसेच ग्रामीण भागामध्ये नेट व अन्य सुविधा नसल्यामुळे नेटबॅंकींग, एटीएम अशा सुविधा देखील नाहीत. त्यामुळे त्यांना पतसंस्था हाच एकमेव पर्याय आहे. परंतू काही ठिकाणी पतसंस्थांची कार्यालये उघडण्यास मज्जाव करण्यात येत आहे.
सहकार आयुक्त व निबंधक सहकारी संस्था महाराष्ट राज्य यांच्या पुणे कार्यालयातून कोव्हीड 19 च्या पाश्र्वभूमीवर पतसंस्थांचे कामकाज सुरु ठेवणेबाबत स्वतंत्र जीआर काढला आहे. यानुसार तरी संस्था चालू ठेवण्यास सहकार्य होईल अशी अपेक्षा ग्रामीण भागातील संस्था चालकांनी व्यक्त केली आहे. कारण ग्रामीण भागातील लोकांना अशा प्रकारच्या आणीबाणीच्या काळात मदतीसाठी पतसंस्था हा एकमेव आधार असल्याचे दिसून येत आहे.
दरम्यान, आजही ग्रामीण भागामध्ये लोकांना मास्क मिळत नाहीत अशावेळी शिवसमर्थ समुहाचे शिल्पकार अॅड.जनार्दन बोत्रे यांनी स्थानिक महिलांकडून मास्क बनवून घेतले आहेत आणि हे मास्क सर्व कर्मचारी, संचालक, सल्लागार आणि त्यांचे कुटूंबीय, मान्याचीवाडी (गुढे) या वाडीतील प्रत्येक घरामध्ये दिले आहेत. तसेच अजून इतर वाडया वस्त्यामध्ये वाटप करण्याचे प्रयत्न आहेत. सामाजिक बांधिलकी जपली आहे. तसेच शिवसमर्थ संस्था आणि परिवार यांच्या पुढाकाराने रक्तदान शिबीर आयोजित करण्याचे निश्चित करण्यात आले आहे. अशाप्रकारचे काम प्रत्येक वाडी वस्तीवरील सामाजिक संस्था, मंडळे यांनी करायला हवे अशीही अपेक्षा अॅड.जनार्दन बोत्रे यांनी व्यक्त केले आहे.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
⚫ लोकांना सेवा मिळावी हाच हेतू:
⚫ कोव्हीड 19 चा प्रार्दूभाव झाल्यापासून केंद्र व राज्य सरकारने काळजी घेण्याबाबत ज्या आदर्श सुचना केल्या आहेत. त्यानुसार आम्ही शाखेमध्ये कमीत कमी कर्मचारी, संस्थेत प्रवेश करतेवेळी सॅनिटायझर चा वापर, कर्मचारी वर्गाला मास्क इ. गोष्टी पुरवल्या आहेत. तसेच सोशल डिस्टींक्शन बाबत देखील सुचना केल्या आहेत.
⚫ ग्रामीण भागातील लोकांना त्यांच्या गरजेच्यावेळी पैसा मिळाला पाहिजे त्यांना अडचण निर्माण होवू नये या एकाच भावनेतून आम्ही संस्थेच्या माध्यमातून संचारबंदी, लाॅकडाउन इ. बाबींचे उल्लंघन न होता सेवा देण्याचा प्रयत्न करत आहोत. व आमच्या संस्थेची सर्व कार्यालये जास्तीत जास्त कशी सेवा देतील याकडे लक्ष दिले आहे.
- अॅड.जनार्दन बोत्रे, संस्थापक अध्यक्ष, दि शिवसमर्थ मल्टी.को.आॅप.क्रे.सोसा.लि; तळमावले
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖