विकास शिरसट, मारुती शिरसट, बबलू शिरसट, मनोजभाई शिरसट, आकाराम शिरसट, रोहित शिरसट, भरत शिरसट, तानाजी शिरसट, विजय शिरसट, प्रकाश शिरसट, गुणवंत शिरसट, मंगेश शिरसट, सचिन शिरसट, महादेव शिरसट, दत्तात्रय शिरसट, राहुल शिरसट........
कोकरुड दि : माळवाडी (मेणी, ता.शिराळा) येथील कुस्ती मैदानातील प्रथम क्रमांकाच्या लढतीत विक्रम पारखी (पुणे) याने संदीप काळे (पुणे) यास दुसऱ्या मिनिटाला घुटना डावावर चितपट करीत बाजी मारली. श्री घोडावली देवीच्या यात्रेनिमित्त या कुस्ती मैदानाचे आयोजन केले होते..
मैदाणाचे पूजन हणमंत गायकवाड,आकाराम शिरसट, प्रकाश शिरसट, महादेव शिरसट, गुणवंत शिरसट, सचिन शिरसट यांच्याहस्ते केले.
दुसऱ्या क्रमांकाच्या लढतीत नवनाथ इंगळे (पुणे) यास विभिषण माडेकर (कोल्हापूर) याने पोकळ घिस्सा डावाने पराभूत केले. तिसऱ्या क्रमांकाची सागर लाड (कोल्हापूर) विरुद्ध अभिजित भोसले (पुणे) यांची कुस्ती २४ व्या मिनिटाला बरोबरीत सोडविण्यात आली. चौथ्या क्रमांकाच्या कुस्तीत मनोज कदम याने खेळण्यास नकार दिल्याने अमर पाटील (कोल्हापूर) यास विजयी घोषित केले.
पाचव्या क्रमांकाची प्रदीप माने (शेडगेवाडी) विरुद्ध भावेश सावंत मिनिटाला बरोबरीत सोडविण्यात (सांगली) यांच्यातील कुस्ती २२ व्या आली.१ ते ५ क्रमांकापर्यंतच्या सर्व विजेत्या मल्लांना सुरेश चिंचोलकर यांच्यातर्फे खुराकासाठी तूप देण्यात आले.
इतर विजयी मल्लांमध्ये दत्ता बनकर, अजय शेडगे, बाजीराव माने,विवेक लाड, स्वप्नील मस्के, प्रतीक चवरे, कृष्णा घोडे, अभिजित बनकर, सचिन बिरजे, वेदांत कडोले, आदेश मोहिते, महेश मुळीक, सुजल कांबळे,जयेश जाधव यांचा समावेश आहे.
सुरेश जाधव, विकास शिरसट यांनी समालोचन केले, तर मारुती शिरसट, भरत शिरसट, तानाजी शिरसट, रोहित शिरसट यांनी संयोजन केले. शिवाजी लाड, तानाजी चवरे, सर्जेराव नांगरे, राहुल जाधव, मारुती पाटील यांनी पंच म्हणून काम पाहिले.
या मैदानासाठी ऑलिम्पिकवीर बंडा पाटील-रेठरेकर, माथाडीचे नेते बबनराव चिंचोलकर, संजय शिरसट, विश्वासचे संचालक शिवाजी पाटील, शांताराम जाधव, सुरेश चिंचोलकर, बाथा गोळे, डॉ. अशोक आटुगडे, एकनाथ पाटील, मनोज चिंचोलकर, दिनकर दिंडे, अजित आस्कट, कुमार कडोले आदी उपस्थित होते.
🔺🔻🔺🔻🔺🔻🔻🔺🔻🔺🔻🔺🔻🔺🔻🔺🔻🔺🔻🔻🔺🔻🔺🔻🔺🔻🔺🔻
३५ घरांची वाडी लाखाच्या कुस्त्या शिराळा तालुक्याच्या शेवटच्या टोकावर असलेल्या सावंतवाडी ग्रामपंचायतीखाली माळवाडी येते. या गावात एसटी बस येत नाही. ३५ घरांच्या वाडीत घोडावली देवीच्या यात्रेस ३४ वर्षापूर्वी सुरुवात झाली.
याठिकाणी तालीम, व्यायामशाळा नाही. गावात एकही कुस्ती खेळलेला मल्ल नाही. तरीही यात्रेला भरवण्यात येणाऱ्या या मैदानात दहा रुपयापासून एक लाख रुपयापर्यंतचे इनाम असणाऱ्या कुस्त्या लावल्या जातात.
🔻🔺🔻🔺🔻🔻🔺🔻🔺🔻🔺🔻🔺🔺🔻🔺🔻🔺🔻🔺🔻🔺🔻🔺🔻🔺🔻