तळमावले/वार्ताहर
महाराष्ट्र शासन, ग्रामविकास व पंचायत राज विभाग, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा सातारा अंतर्गत स्वर्ण जयंती ग्राम स्वंयरोजगार योजना, जिल्हा परिषद, सातारा महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत जिल्हास्तरीय स्वयंसहायता समुहाच्या वतीने राजमाता जिजाऊ स्वावलंबन सर्वोत्कृष्ट पत्रकार पुरस्काराने संदीप डाकवे यांना सन्मानित करण्यात आले.
सहकार व पणन मंत्री ना.बाळासाहेब पाटील, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष उदय कबुले, मुख्य कार्यकारी अधिकारी संजय भागवत, उपाध्यक्ष प्रदीप विधाते, शिक्षण व अर्थ समितीचे सभापती मानसिंगराव जगदाळे, कृषी व पशुसंवर्धन सभापती मंगेश धुमाळ, महिला व बालकल्याण समिती सभापती सोनाली पोळ, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक व उपमुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश फडतरे, माजी सभापती शिवाजीराव सर्वगोड, सदस्य सागर शिवदास, सुवर्णा देसाई, भीमराव पाटील, पुणे येथील उपायुक्त सीमा जगताप, समाज कल्याण सभापती कल्पना खाडे, ज्येष्ठ नेते बाळासाहेब भिलारे व इतर मान्यवर यांनी संदीप डाकवे यांचा सन्मानपत्र, बुके, मानिनी यात्रेचा आकर्षक मग देवून गौरव केला.
सातारा येथील झेडपी मैदानावर उद्घाटन झालेल्या मानिनी जत्रा उद्घाटन सोहळयात पाटण तालुक्यातील डाकेवाडी (काळगांव) येथील पत्रकार संदीप डाकवे यांना महाराष्ट्र राज्य शासनाच्या ग्राम विकास व पंचायत राज विभागाच्या वतीने राजमाता जिजाऊ स्वावलंबन सर्वोत्कृष्ट पत्रकार पुरस्काराने गौरवण्यात आले. या पुरस्कारामुळे संदीप डाकवे यांच्या दर्जेदार लेखणीची मोहर सलग चैथ्यांदा शासन दरबारी ठळकपणे उमटली आहे.