श्री संतकृपा फार्मसी मध्ये दोन दिवसीय राष्ट्रीय चर्चासत्र.

श्री संतकृपा फार्मसी मध्ये दोन दिवसीय राष्ट्रीय चर्चासत्र.
कराड: श्री संतकृपा शिक्षण संस्था घोगाव तालुका कराड संचलित श्री संतकृपा कॉलेज ऑफ फार्मसी येथे "बायोटेक  व बायो फार्म या क्षेत्रातील संशोधन व संधी "या विषयावर दोन दिवसीय कार्यशाळा दिनांक 11व 12  फेब्रुवारी २०२० रोजी. महाविद्यालयाने आयोजित केली आहे.सदर कार्यशाळेमध्ये थर्मो फिशर या आंतरराष्ट्रीय कंपनीमधील तज्ञ मार्गदर्शन करणार आहेत. तसेच नवनवीन उपकरणाचे प्रात्यक्षिक दाखविवणार आहेत. विज्ञान व फार्मसी शाखेतील विद्यार्थ्यांनी सदर कार्यशाळेचा लाभ घ्यावा असे आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजयानंद अरलेलीमट यांनी केले आहे.