सह्याद्री साखर कारखान्याची निवडणूक बिनविरोध. सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांच्या नेतृत्वावर सभासदांचा प्रचंड विश्वास.


कराड : प्रतिनिधी -
आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या प्रेरणेतून व सह्याद्रिचे संस्थापक स्वर्गीय पी. डी. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्थापन झालेल्या यशवंतनगर ता. कराड येथील सह्याद्री सहकारी साखर कारखान्याची पंचवार्षिक निवडणूक आज बिनविरोध झाली. राज्याचे विद्यमान सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांची नुकतीच राज्याच्या सहकार मंत्रीपदी निवड झाली असून सह्याद्री कारखान्याच्या सर्व सभासदांनी ही निवडणूक बिनविरोध करून सहकारात आदर्श निर्माण केला आहे.
सह्याद्री कारखान्याच्या निवडणुकीची प्रक्रिया ६ जानेवारीला सुरू झाली. यात सुमारे 165 उमेदवारी अर्ज दाखल केले होते. 28 जानेवारी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता. मंत्री बाळासाहेब पाटील यांनी अर्ज दाखल केलेल्या उमेदवारांशी चर्चा केल्यानंतर दुपारपर्यंत उर्वरित सर्व जणांनी आपले अर्ज मागे घेतल्याने कारखान्याच्या 21 जागांसाठी 21 उमेदवार बिनविरोध झाले.
दरम्यान कारखान्याच्या या पंचवार्षिक निवडणुकीत जुन्या नव्यांचा मेळ घातला आहे. युवा नेते यशराज पाटील यांच्यासह सोमवारी अकरा जणांना नव्याने संचालक म्हणून संधी देण्यात आली आहे तर या संचालक मंडळात मंत्री पाटील यांच्यासह दहा विद्यमान संचालकांना संधी मिळाली आहे.
बिनविरोध विजयी उमेदवार
कराड गट– नामदार बाळासाहेब पाटील, जशराज पाटील, रामचंद्र पाटील,तांबवे.
तळबिड गट– माणिकराव पाटील–घोणशी, सुरेश माने–चरेगाव, बजरंग पवार–बेलवडे हवेली.
उंब्रज गट– सर्जेराव खंडाईत–पाल, दत्तात्रय जाधव–उंब्रज.
कोपर्डे हवेली गट– रामदास पवार–विरवडे, शंकर चव्हाण–कोपर्डे हवेली.
मसूर गट– मानसिंगराव जगदाळे–मसूर, संतोष घार्गे–वडगाव, जयराम स्वामी, लालासाहेब पाटील–कवठे.वाठार.
किरोली गट– कांतीलाल भोसले–तारगाव, वसंत कणसे–पिंपरी, अविनाश माने–रहिमतपूर.
महिला राखीव– शारदा पाटील–नडशी, लक्ष्मी गायकवाड–वाठार किरोली.
अनुसूचित जाती–जमाती– जयवंत थोरात,हिंगनोळे,
भटक्या जाती जमाती –लहूराज जाधव,मसूर,
तर मागास प्रवर्ग– संजय कुंभार,नांदगाव.