तळमावले तालुका पाटण येथील वांग व्हॅली भवनाचे उदघाटन करताना आनंदराव अडसूळ , शेखर चरेगावकर , सुभाष बावडेकर व इतर मान्यवर.
ढेबेवाडी प्रतिनिधी :
सहकारात अनेक अडचणी येतात पण या अडचणीवर मात करून सामाजिक बांधिलकी जपून पारदर्शक कारभार करून जनमानसात विश्वासार्हता प्राप्त करून नावलौकिक प्राप्त करणारी व आपल्या पायावर मजबूतपणे उभी असणारी सहकाराचा उत्तम आदर्श घालून देणारी संस्था म्हणजे
वांगव्हॅली सोसायटी होय.या संस्थेने तळमावले येथे स्वतःचे मालकीचे भवन उभारून चांगली प्रगती साधली आहे .याचा आनंद वांगव्हॅली परिवाराच्या चेहऱ्यावर दिसून येत आहे. याचे श्रेय चेरमन सुभाषराव बावडेकर व विधमान संचालकांना जाते असे प्रतिपादन माजी केंद्रीय मंत्री आनंदराव अडसूळ यांनी केले.
तळमावले ता.पाटण येथे वांगव्हॅली क्रीडेट सोसायटी लि. मुंबई या संस्थेच्या वांगव्हॅली भवनाचा उदघाटन सोहळा नुकताच यांच्या शुभहस्ते पार पडला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.
यावेळी सहकार परिषदेचे अध्यक्ष शेखर चरेगावकर, आत्माराम थोरात, श्रीमती हौसाबाई डाकवे पंचायत समिती गटनेते पंजाबराव देसाई,पंचायत समिती सदस्यां सीमा मोरे,पाटण तालुका महिला काँग्रेसच्या अध्यक्षा वंदनाताई आचरे,माजी प्राचार्य प्रकाश पाटील भाजपच्या महिला आघाडीच्या जिल्हा अध्यक्षा कविता कचरे,माजी प.स.सदस्य नानासाहेब सावंत,सरपंच शोभाताई भुलूगडे,यांची प्रमुख उपस्थिती होती.
आनंदराव अडसूळ म्हणाले कै. बाबुराव डाकवे अतिशय साधा माणूस होते पण सहकारातील हुशार होते त्यांनी सहकाराची कास धरून आपल्या सर्व सहकार्यांना बरोबर घेऊन संस्था स्थापन केली .अलीकडे मुंबईतील माणसांच्या तुलनेत गावाकडचा माणूस कुठेही कमी नाही संस्थेच्या शाखा किती यापेक्षा स्वतःच्या मालकीच्या जागा असणाऱ्या शाखा किती यावरती संस्थेचा विकास अवलंबून असतो. सहकाराची चळवळ पश्चिम महाराष्ट्राने जिवंत ठेवली. समृद्ध केली व तळागाळापर्यंत वाढवण्याचे महत्त्वपूर्ण काम केले.
शेखर चरेगावकर म्हणाले या भागातून मुंबईला संस्था निर्माण झाली व भागातही त्याची शाखा सुरू केली असून या संस्थेने ग्रामीण भागाशी आपलीनाळ जोडली आहे. शहरात गेला की माणसाला गावचा विसर पडतो पण संस्थेकडून असे झालं नाही उलट गरजेच्या ठिकाणी शाखा चालू केली,तसेच सामाजिक कार्याची जाणं ठेवत सहकार भवन उभे केले ही कौतुकाची बाब आहे.
यावेळी संस्थापक आत्माराम थोरात श्रीमती हौसाबाई डाकवे विधमान चेरमन सुभाष बावडेकर, व्हा.चेरमन लक्ष्मण येळवे,सुरेश मस्कर,दिलीप डाकवे, हणमंत मोळावडे, उत्तम राजे, अशोक डाकवे,अनिता देसाई ,देवबा लांबोर, ईश्वर भिंगारदेवे, भारती डाकवे अशोक चव्हाण तसेच अष्टविनायक बिल्डर्सचे संजय लोहार,नितीन पाटील,तुषार देशमुख, श्रीकांत आचरे,अभिजित कडव यांचा संस्थेच्या वतीने विशेष सत्कार करण्यात आला. संदीप डाकवे यांना आदर्श पत्रकार पुरस्कार मिळाल्याबद्दल सत्कार करण्यात आला.
यावेळीअशोकराव देसाई,आबासाहेब शेडगे, राजेंद्र पवार सर यांचीही भाषणे झाली संजय लोहार,अभिजित कडव यांनी स्वागत व सूत्रसंचालन केले. सुभाष बावडेकर यांनी प्रास्ताविक करून आभार मानले .कार्यक्रमास आर बी पाटील सर, शिवाजीराव पवार, सुरेश पाटील, गोविंदराव गोटूगडे,जयवंत देसाई, एम.बी.आचरे,संजय भुलूगडे,भगवान नलवडे सरपंच जयश्री मुटल,राजाराम कात्रे काळगाव कुंभारगाव परिसरातून विविध पधादीकरी सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.