ALL ताज्या बातम्या विशेष लेख संपादकीय वाढदिवस विशेष व्यंगचित्र मुलाखत ADVT/ जाहिरात राजकारण कृषीवार्ता शैक्षणिक
870 नागरिकांना दिला आज डिस्चार्ज; 682 जणांचे नमुने पाठविले तपासणीला
September 3, 2020 • चंद्रकांत चव्हाण • ताज्या बातम्या

870 नागरिकांना दिला आज डिस्चार्ज; 682 जणांचे नमुने पाठविले तपासणीला

सातारा दि. 3 (जिमाका): जिल्ह्यात विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटर डिसीएच, डिसीएससी, व सीसीसी येथून आज संध्याकाळपर्यंत उपचार घेत असलेल्या 870 नागरिकांना आज दहा दिवसांनतर घरी सोडण्यात आले तर 682 जणांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.

 

                स्व. क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय सातारा येथील 11, उपजिल्हा रुग्णालय कराड 13, उपजिल्हा रुग्णालय फलटण 54, कोरेगाव 37, वाई 56, खंडाळा 57, रायगांव 76, पानमळेवाडी 45, मायणी 27, महाबळेश्वर 50, दहिवडी 49, खावली 41, व कृष्णा मेडिकल कॉलेज कराड येथे 166 असे एकूण 682 जणांचे नमुने तपासणीला पाठविण्यात आले आहेत, अशी माहितीही जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.

 

घेतलेले एकूण नमुने -- 47347

 

एकूण बाधित -- 15960

 

घरी सोडण्यात आलेले --- 9021

 

मृत्यू -- 443

 

उपचारार्थ रुग्ण -- 6496