ALL ताज्या बातम्या विशेष लेख संपादकीय वाढदिवस विशेष व्यंगचित्र मुलाखत ADVT/ जाहिरात राजकारण कृषीवार्ता शैक्षणिक
22 नागरिकांना डिस्चार्ज तर 411 नागरिकांचे नमुने तपासणीला
July 6, 2020 • चंद्रकांत चव्हाण • ताज्या बातम्या

22 नागरिकांना डिस्चार्ज तर 411 नागरिकांचे नमुने तपासणीला

 

सातारा दि.6(जिमाका): जिल्ह्यात विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटरमध्ये उपचार घेवून बऱ्या झालेल्या 22 नागरिकांना आज दहा दिवसांनतर घरी सोडण्यात आल्याची माहिती जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली.

बऱ्या होवून घरी सोडलेल्यांमध्ये कराड तालुक्यातील तारुख येथील वय 76,22, 27,28,48,50 व 21 व 22 वर्षीय पुरुष आणि 25 व 30 वर्षीय महिला, उंब्रज येथील 26 वर्षीय पुरुष, येळगाव येथील 53 वर्षीय महिला, बनवडी येथील 29 वर्षीय महिला, चरेगाव येथील 32 वर्षीय महिला आणि 4 वर्षीय बालक, जखीणवाडी येथील 19 वर्षीय युवक, अमृतवाडी येथील 50 वर्षीय पुरुष.,

 

वाई तालुक्यातील 34 वर्षीय पुरुष.,

सातारा तालुक्यातील धावली (रोहोट) येथील 45 वर्षीय महिला.,

 

खटाव तालुक्यातील येळीव येथील 76 वर्षीय महिला आणि वय 24 व 26 वर्षीय पुरुष यांचा समावेश आहे.

 

411 नागरिकांचे नमुने तपासणीला

क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा यथील 70, कृष्णा मेडीकल कॉलेज कराड येथील 65, वेणताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय कराड येथील 65, उपजिल्हा रुग्णालय फलटण येथील 33, ग्रामीण रुग्णालय कोरेगाव येथील 4, ग्रामीण रुग्णालय वाई येथील 48, कोरोना केअर सेंटर रायगाव येथील 11, पानमळेवाडी येथील 10, मायणी येथील 27, महाबळेश्वर येथील 24,दहिवडी येथील 39, खावली येथील 15 अशा एकूण 411 नागरिकांच्या घशातील स्त्रावांचे नमुने एन.सी.सी.एस.पुणे येथे तपासणीला पाठविण्यात आले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली.

 

घेतलेले एकुण नमुने

15253

एकूण बाधित 1336

घरी सोडण्यात आलेले 813

मृत्यु 55

उपचारार्थ रुग्ण 468