ALL ताज्या बातम्या विशेष लेख संपादकीय वाढदिवस विशेष व्यंगचित्र मुलाखत ADVT/ जाहिरात राजकारण कृषीवार्ता शैक्षणिक
21 वर्षीय निकट सहवासित तरुण कोरोना बाधित
April 21, 2020 • चंद्रकांत चव्हाण

21 वर्षीय निकट सहवासित तरुण  कोरोना बाधित

सातारा दि.  21( जि. मा. का ) :    क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथे दाखल असलेल्या बाधित रुग्णाचा  निकट सहवासित 21 वर्षीय तरुणाचा  रिपोर्ट आला असून तो कोविड बाधित  असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली आहे. 
आता सातारा जिल्ह्यात 12 रुग्ण कोविड बाधित असून आता पर्यंत 3 (कोविड19)  मुक्त होऊन रुग्णालयातून सोडले आहेत तर 2 जणांचा मृत्यू झाला आहे.