ALL ताज्या बातम्या विशेष लेख संपादकीय वाढदिवस विशेष व्यंगचित्र मुलाखत ADVT/ जाहिरात राजकारण कृषीवार्ता शैक्षणिक
14 जणांचे रिपोर्ट आले पॉझिटिव्ह 
June 21, 2020 • चंद्रकांत चव्हाण • ताज्या बातम्या

14 जणांचे रिपोर्ट आले पॉझिटिव्ह 

सातारा दि. 21 ( जि. मा. का ) : एन. सी. सी. एस. पुणे येथे तपासणी करण्यात आलेल्या 14 नागरिकांचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्यचिक्सिक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली आहे.

 यामध्ये फलटण तालुक्यातील शेरेचीवाडी ( हिंगणगाव ) येथील 61 व 32 वर्षीय पुरुष आणि 27 वर्षीय महिला.

 कराड तालुक्यातील वडगाव (उंब्रज) येथील 28, 20 व 44 वर्षीय महिला.

 खटाव तालुक्यातील वाकळवाडी येथील 35 वर्षीय महिला व 27 वर्षीय पुरुष.

 माण तालुक्यातील खोकडे येथील 34 वर्षीय पुरुष.

 जावली तालुक्यातील म्हातेखुर्द येथील 54 वर्षीय महिला व 62 वर्षीय पुरुष, केडांबे येथील 65 वर्षीय पुरुष.

 सातारा तालुक्यातील राजापूरी येथील 5 वर्षीय बालिका व 31 वर्षीय महिला.