ALL ताज्या बातम्या विशेष लेख संपादकीय वाढदिवस विशेष व्यंगचित्र मुलाखत ADVT/ जाहिरात राजकारण कृषीवार्ता शैक्षणिक
14 जणांचे रिपोर्ट आले पॉझिटिव्ह
June 12, 2020 • चंद्रकांत चव्हाण • ताज्या बातम्या

14 जणांचे रिपोर्ट आले पॉझिटिव्ह

सातारा दि. 12 ( जि. मा. का ) : विविध रुग्णालयांमध्ये दाखल असणाऱ्या 14 जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली आहे.

बाधित रुग्णांमध्ये फलटण तालुक्यातील वडले येथील 24 वर्षीय पुरुष.

कराड तालुक्यातील तुळसण 50 वर्षीय व 22 वर्षीय महिला, 35 वर्षीय पुरुष

सातारा तालुक्यातील गोजेगाव येथील 74 वर्षीय पुरुष, कारंडवाडी येथील 23 वर्षीय महिला व 5 वर्षाची मुलगी, सैदापूर येथील 23 वर्षीय पुरुष, खिंडवाडी येथील 44 वर्षीय महिला

कोरेगाव तालुक्यातील साप येथील 39 वर्षीय पुरुष

जावली तालुक्यातील धोंडेवाडी येथील 51 वर्षीय महिला व 25 वर्षीय पुरुष

खटाव तालुक्यातील राजाचे कुर्ले येथील 53 वर्षीय पुरुष

वाई तालुक्यातील वेळे येथील 50 वर्षीय पुरुष यांचा समावेश आहे.

आत्तापर्यंत जिल्ह्यात एकूण 718 रुग्ण आढळले आहेत. 472 जणांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. विविध रुग्णालयांमध्ये 213 जणांवर उपचार सुरु असून 31 जणांचा मृत्यु झालेला आहे.