ALL ताज्या बातम्या विशेष लेख संपादकीय वाढदिवस विशेष व्यंगचित्र मुलाखत ADVT/ जाहिरात राजकारण कृषीवार्ता शैक्षणिक
14 अनुमानितांचे रिपोर्ट आले निगेटिव्ह.
April 20, 2020 • चंद्रकांत चव्हाण

 

 

14 अनुमानितांचे रिपोर्ट आले निगेटिव्ह. 2 अनुमानित व 10 जणांना पुनर्तपासणीसाठी विलगीकरण कक्षात दाखल. 

सातारा दि.20 (जि.माका) :  कृष्णा मेडिकल कॉलेज, कराड येथील 11, उपजिल्हा रुग्णालय, कराड येथील 3 असे एकूण 14 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह असल्याचे बी. जे. वैद्यकीय महाविद्यालय, पुणे यांनी कळविले आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली आहे.
क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथे रात्री उशिरा 10 नागरिकांना बाधित रुग्णाचे सहवासित म्हणून 14 दिवसानंतरच्या पुनर्तपासणी करीता विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले आहे. तसेच उपजिल्हा रुग्णालय, कराड व फलटण येथे प्रत्येकी 1 नागरिक अशा एकूण 12 जणांच्या घशातील स्त्रावांचे नमुने बी. जे. वैद्यकीय महाविद्यालय, पुणे येथे तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे, अशी माहितीही  डॉ.  गडीकर यांनी दिली आहे.