ALL ताज्या बातम्या विशेष लेख संपादकीय वाढदिवस विशेष व्यंगचित्र मुलाखत ADVT/ जाहिरात राजकारण कृषीवार्ता शैक्षणिक
साताऱ्यात कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला
March 23, 2020 • चंद्रकांत चव्हाण

काल रात्री दाखल केलेली महिला कोविड-19 बाधित.

सातारा दि. 23 :  काल विलगीकरण कक्षात दाखल केलेल्या  45 वर्षीय महिलेला खोकला असल्यामुळे रात्री उशिरा  अनुमानित म्हणून शासकीय रुग्णालय येथे विलगीकरण कक्षात दाखल केले होते.   या महिलाचा रिपोर्ट एन.आय.व्ही. पुणे यांच्याकडून प्राप्त झाला असून ही महिला कोविड- 19 बाधित असल्याचे कळविले आहे, अशी माहिती  जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.आमोद गडीकर यांनी दिली. 
या महिलेला उच्च रक्तदाबाचा त्रास 15 वर्षापासून आहे. त्यावर उपचार चालू आहेत. सध्या या महिलेचा रक्तदाब नियंत्रणात आहे. तसेच या महिलेला  सध्या विलगीकरण कक्षात ठेवले असून प्राथमिक तपासण्यानंतर या महिलेची प्रकृती स्थिर आहे असल्याचेही डॉ. गडीकर यांनी कळविले आहे.               

      तथापि कोणीही घाबरून जावू नये, जिल्हा प्रशासन पूर्णपणे दक्ष आहे. हा संसर्ग रोखण्यासाठी नागरिकांनी जिल्हा प्रशासानाला मदत करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी केले आहे.