ALL ताज्या बातम्या विशेष लेख संपादकीय वाढदिवस विशेष व्यंगचित्र मुलाखत ADVT/ जाहिरात राजकारण कृषीवार्ता शैक्षणिक
सातारा येथे 15 तर कराड येथे 51 अनुमानित म्हणून विलगीकरण कक्षात दाखल .   
April 8, 2020 • चंद्रकांत चव्हाण

सातारा दि. 8 :   जिल्हा रुग्णालय, सातारा येथे कोरोना बाधित रुग्णाच्या निकट सहवासित असलेल्या 8 ते 70 वर्ष वयोगटातील 11 पुरुष व 4 महिला अशा 15 नागरिकांना आज विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले. तसेच कृष्णा हॉस्पिटल, कराड येथे कोरोना बाधित निकट सहवासित असणाऱ्या 1 ते 80 वर्ष वयोगटातील 31 पुरुष व 17 महिला असे एकूण 48 नागरिकांना व 1 ते 23 वर्ष वयोगटाती 3 महिलांना श्वसन संस्थेच्या तीव्र जंतुसंसर्गामुळे विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले आहे. या सर्व 66 अनुमानितांच्या घशातील स्त्रावाचे नमुने  बी.जे. महाविद्यालय, पुणे  येथे तपासणीसाठी पाठविण्यात आले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक  डॉ. आमोद गडीकर यांनी कळविले आहे.