ALL ताज्या बातम्या विशेष लेख संपादकीय वाढदिवस विशेष व्यंगचित्र मुलाखत ADVT/ जाहिरात राजकारण कृषीवार्ता शैक्षणिक
सह्याद्री हॉस्पीटलमधील सहा जण झाले कोरोना मुक्त; आज सोडले घरी, आज पर्यंत जिल्ह्यातील 45 नागरिक झाले कोरोनमुक्त
May 14, 2020 • चंद्रकांत चव्हाण

सह्याद्री हॉस्पीटलमधील सहा जण झाले कोरोना मुक्त; आज सोडले घरी, आज पर्यंत जिल्ह्यातील 45 नागरिक झाले कोरोनमुक्त

सातारा दि. 14 ( जि. मा. का ):    सह्याद्री हॉस्पीटल, कराड येथील 6 कोरोना बाधित रुग्ण आज पूर्णपणे बरे झाले असून त्यांना आज घरी सोडण्यात आले आहे.

 6 रुग्णांची 14 व 15 दिवसा नंतर पुन्हा चाचणी करण्यात आली. या चाचणीमध्ये हे  6 कारोना बाधीत रुग्ण निगेटिव्ह आले आहेत. या 6 जणांना आज घरी सोडण्यात आले. 6 कोरोना मुक्त झालेल्यांमध्ये 5 परिचारिका तर 10 वर्षाच्या मुलाचा समावेश आहे.

  कोरोना मुक्त झालेल्या 6 जणांचे प्रांताधिकारी उत्तम दिघे, तहसीलदार अमरदिप वाकडे, तालुका वैद्यकीय अधिकारी संगिता देशमुख, सह्याद्री हॉस्पीटलचे संचालक अमित चव्हाण, वैद्यकीय प्रमुख व्यकंटेश मुळे या सर्वांनी  यांनी पुष्पगुच्छ देवून स्वागत केले. यावेळी   परिचारिका व कर्मचारी उपस्थित होते.

आत्तापर्यंत क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथून 8 व कृष्णा मेडिकल कॉलेज, कराड येथून 27 व वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय, कराड येथील 4 व सह्याद्री हॉस्पीटल, कराड येथील 6 असे जिल्ह्यातील  एकूण 45 रुग्ण कारोना मुक्त  झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे.