ALL ताज्या बातम्या विशेष लेख संपादकीय वाढदिवस विशेष व्यंगचित्र मुलाखत ADVT/ जाहिरात राजकारण कृषीवार्ता शैक्षणिक
सकारात्मक ते साठी ऑनलाइन ध्यानयोग महाशिबिराचा लाभ घ्या : प. पु.श्री. शिवकृपानंद स्वामी.
April 23, 2020 • चंद्रकांत चव्हाण

कराड - सध्याच्या लॉक डाऊनच्या काळात नैराश्यपूर्ण वातावरण आहे. तथापि ध्याना द्वारे स्वतःला सकारात्मक दिशेने घेऊन जाण्याची सुवर्णसंधी आपल्यापाशी आहे. त्यासाठी प. पु. श्री. शिवकृपानंद स्वामी यांच्या प्रवचनांचे ऑनलाईन प्रसारण कऱण्यात आले आहे. समर्पण ध्यान योगाकडून लोकांना जोडण्याच्या  
उद्देशाने एका ऑनलाईन ध्यानयोग महाशिबिराचे आयोजन केले जात आहे. याचे प्रसारण यु ट्युब वरून होत आहे. २३ एप्रिल ते ३० एप्रिल पर्यंत  सायंकाळी ४:०० वाजता त्याचे प्रक्षेपण होत आहे. आपण घरी बसून अथवा या www.samarpanmeditation.org वेबसाईटच्या लिंकच्या आधारे हे शिबीर पाहू शकता.