ALL ताज्या बातम्या विशेष लेख संपादकीय वाढदिवस विशेष व्यंगचित्र मुलाखत ADVT/ जाहिरात राजकारण कृषीवार्ता शैक्षणिक
शिवसमर्थ’कडून पत्रकारांना जीवनावश्यक वस्तुंच्या कीटचे वाटप
May 15, 2020 • चंद्रकांत चव्हाण • ताज्या बातम्या

शिवसमर्थ’कडून पत्रकारांना जीवनावश्यक वस्तुंच्या कीटचे वाटप.

तळमावले/वार्ताहर
पाटण तालुक्यातील तळमावले येथील दि शिवसमर्थ मल्टी.को.आॅप.क्रे.सोसा.लि; व शिवसमर्थ परिवार यांच्यावतीने ढेबेवाडी विभागातील सर्व पत्रकारांना जीवनावश्यक वस्तूंच्या कीटचे वाटप संस्थेचे संस्थापक/अध्यक्ष अॅड.जनार्दन बोत्रे यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली संस्थेचे उपमहाव्यवस्थापक हेमंत तुपे व सहकारी यांनी केले. ‘‘सामथ्र्य आहे चळवळीचे, जे जो करील तयाचे परंतू तेथे भगवंताचे अधिष्ठान पाहिजे’’ या ब्रीद वाक्यानुसार 15 आॅगस्ट, 2006 पासून आर्थिक सेवा देत विविध समाजोपयोगी उपक्रम राबवत  आहे.
यापूर्वी संस्थेने मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी 1 लाखाचा धनादेश दिला आहे. तसेच ग्रामीण भागामध्ये आतापर्यंत सुमारे 5 हजार मास्कचे वाटप केले असून 1 लाख मास्क वाटप करणार आहेत. तसेच प्रशासनाने कोरोना प्रतिबंधासाठी सांगितलेल्या मार्गदर्शक तत्त्वांचा प्रसार करणारी दर्जेदार व्हिडीओ क्लीप तयार करुन ती सोशल मिडीया, स्थानिक चॅनेलवर प्रसारित केली आहे.  याशिवाय प्रत्येक नैसर्गिक आपत्तीत शिवसमर्थ संस्था आणि परिवार नेहमी अग्रेसर असतो.  
लाॅकडाऊनच्या काळात सुध्दा पत्रकार बंधू अविरतपणे आपले कर्तव्य बजावत आहेत. त्यांचे आर्थिक उत्पन्न कमी झाले. तरी स्वखर्चाने ते सध्याच्या काळात सेवा करत आहेत. त्या सेवेतून उतराई म्हणून ही छोटीशी भेट शिवसमर्थ परिवाराकडून देण्यात आली आहे. ग्रामीण भागातील पत्रकारांना काहीतरी मदत करावी या हेतूने संस्थेच्यावतीने कीटचे वाटप करण्यात आले आहे. दैनंदिन जीवनात आवश्यक असणााऱ्या बहुतेक सर्व वस्तूंचा समावेश या कीटमध्ये करण्यात आला आहे. राजेश पाटील, नितीन बेलागडे, हरीष पेंढारकर, पोपट माने, पोपट झेंडे, बाळासाहेब रोडे, संदीप डाकवे, प्रमोद पाटील, संतोष पवार, नितीन कचरे, अमित शिंदे, प्रेस फोटोग्राफर अनिल देसाई व विभागातील अन्य पत्रकार यांना हे कीट देण्यात आले. सदर कीट दिल्याबद्दल सर्व पत्रकारांनी संस्थेचे आभार मानले आहेत.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
प्रशासनाला सहकार्य करावे:
ग्रामीण विभागातील पत्रकार अनेक अडीअडचणींना तोंड देत विभागातील समस्यांना न्याय देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत असतो. अशा लढवय्या पत्रकारांना सहकार्य करण्याच्या हेतूने सदर मदत संस्था आणि परिवार यांच्या माध्यमातून देण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. समाजातील दानशूर व्यक्तींनीही या काळात प्रशासनाला सहकार्य करत गरजूंना मदत करण्यासाठी पुढे यावे असे मत संस्थेेचे संस्थापक अध्यक्ष अॅड.जनार्दन बोत्रे यांनी केले आहे.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖