ALL ताज्या बातम्या विशेष लेख संपादकीय वाढदिवस विशेष व्यंगचित्र मुलाखत ADVT/ जाहिरात राजकारण कृषीवार्ता शैक्षणिक
शहीद जवान कै.गजानन मोरे यांचे २१ व्या पुण्यस्मरण दिनानिमित्त गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई यांचेकडून अभिवादन.
August 27, 2020 • चंद्रकांत चव्हाण • ताज्या बातम्या

शहीद जवान कै.गजानन मोरे यांचे २१ व्या पुण्यस्मरण दिनानिमित्त गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई यांचेकडून अभिवादन.

पाटण दि.२७:

सन १९९९ ला झालेल्या कारगील युध्दात शहिद झालेले पाटण तालुक्यातील भुडकेवाडी येथील शहिद जवान कै.गजानन मोरे यांचे आज दि.२७ ऑगस्ट रोजीचे २१ वे पुण्यस्मरण दिनानिमित्त गृह व वित्तराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंनी प्रतिवर्षाप्रमाणे शहिद जवान कै.गजानन मोरे यांचे पुतळयास पुष्पचक्र अर्पण करुन अभिवादन केले.कोरोनाच्या संकटामुळे यंदाच्या वर्षीचा पुण्यस्मरण दिनाचा कार्यक्रम गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंचे प्रमुख उपस्थितीत अत्यंत साध्या पध्दतीने साजरा करण्यात आला. यावेळी पाटणचे प्रातांधिकारी श्रीरंग तांबे, तहसिलदार समीर यादव,गटविकास अधिकारी मीना साळुंखे, उंब्रजचे सपोनी अजय गोरड यांची प्रमुख उपस्थिती होती.

                  प्रारंभी गृह व वित्तराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे हस्ते शहीद जवान कै.गजाजन मोरे यांचे भूडकेवाडी ता.पाटण येथील शहीद स्मारकातील अर्धाकृती पुतळयाला पुष्पहार व पुष्पचक्र अर्पण करण्यात येवून अभिवादन करण्यात आले यानंतर उपस्थित मान्यवरांनीही पुष्पचक्र अर्पण केले. अभिवादनानंतर गृह व वित्तराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे हस्ते शहीद स्मारक पुढील ध्वजारोहण करण्यात आला.यावेळी सातारा जिल्हा पोलीस दलाच्या पोलीस बँन्ड पथकाने राष्ट्रगीत सादर करुन अभिवादन केले. भुडकेवाडी येथील जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थीनीनी ध्वजगीत सादर केले.      

                           देशाच्या संरक्षणासाठी सातारा जिल्हयातील अनेक जवानांनी आपल्या प्राणांची आहूती दिली आहे. योगदान,बलीदान दिले आहे.त्यांचे स्मरण करणे त्यांच्या कार्यापुढे नतमस्तक होणे, अभिवादन करणे हे आपले सर्वांचे आद्यकर्तव्य आहे.सन १९९९ ला झालेल्या कारगील युध्दात शहिद झालेले पाटण तालुक्यातील भुडकेवाडी येथील शहिद जवान कै.गजानन मोरे हे त्यातीलच एक. शहिद जवान कै.गजानन मोरे यांनी आपल्या गावाचे, तालुक्याचे, जिल्ह्याचे, महाराष्ट्राचे नाव देशामध्ये अजरामर केले आहे.त्यांच्या कुटुंबावर दुर्दैवाने त्यावेळी जो प्रसंग ओढावला त्यातून हे कुटुंब सावरत आहे त्यांना साथ करणे, पाठीशी ठामपणे उभे राहणे हे आपले कर्तव्य आहे.

पाटण मतदारसंघाचा प्रथम नागरिक म्हणून मी प्रतिवर्षी कुठेही असलो तरी आजच्या दिवशी शहिद जवान कै.गजानन मोरे यांचे स्मृतीदिनी भूडकेवाडी येथे उपस्थित असतो. मी महाराष्ट्र राज्याचा गृहराज्यमंत्री म्हणून शहिद जवान कै. गजानन मोरे यांच्या स्मृतिला उजाळा देत त्यांना राज्य शासनाच्या व राज्यातील तमाम जनतेच्या वतीने विनम्र अभिवादन करतो. असे यावेळी बोलताना गृह व वित्तराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई म्हणाले.

              कार्यक्रमास याप्रसंगी लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे संचालक गजानन जाधव, सोमनाथ खामकर,बबनराव भिसे,माजी पंचायत समिती सदस्य बबनराव शिंदे, शिवदौलत सहकारी बँकेचे संचालक अभिजित पाटील, राजेंद्र चव्हाण यांच्यासह विविध गावचे सरपंच,सदस्य कै.गजानन मोरे यांच्या मातोश्री श्रीमती चतुराबाई मोरे आणि त्यांचे कुटुंबिय यांची प्रमुख उपस्थिती होती.