ALL ताज्या बातम्या विशेष लेख संपादकीय वाढदिवस विशेष व्यंगचित्र मुलाखत ADVT/ जाहिरात राजकारण कृषीवार्ता शैक्षणिक
रमेश मोरे युवा मंच ची "मदत नव्हे कर्तव्य" या भावनेतून सामाजिक बांधिलकी.
June 14, 2020 • चंद्रकांत चव्हाण • ताज्या बातम्या

चिखलेवाडी कुंभारगाव येथे आर्सेनिक अल्बम 30 गोळ्यांचे वाटप.

कुंभारगाव दि.

 रमेश मोरे युवा मंच ची "मदत नव्हे कर्तव्य" या भावनेतून सामाजिक बांधिलकी.

पाटण तालुक्यातील ग्रामपंचायत चिखलवाडी कुंभारगाव येथे पाटण पंचायत समितीचे माजी उपसभापती रमेश मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या युवा मंचच्या कार्यकर्त्यांनी कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर ग्रामस्थांना आर्सेनिक अल्बम 30 या गोळ्यांचे घरोघरी जाऊन वाटप करण्यात आले. कोरोना चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी व लोकांची प्रतिकारशक्ती वाढण्याच्या दृष्टीने या गोळ्या अतिशय उपयुक्त आहेत. त्यामुळे सामाजिक बांधिलकी म्हणून चिखलेवाडीत या युवा मंचच्या कार्यकर्त्यांनी घरोघरी जाऊन या गोळ्यांचे वाटप केले व या गोळ्या कशा पद्धतीने खायच्या याचे मार्गदर्शन ग्रामस्थांना केले. या गोळ्यांचे कोणतेही दुष्परिणाम नाहीत त्यामुळे लहान मुलांपासून वृद्ध व्यक्ती पर्यंत सर्वांना या गोळ्या चालतात. या गोळ्यांचे महत्व ग्रामस्थांना घरोघरी जाऊन पटवून दिले

केंद्र सरकारच्या आयुष मंत्रालयाने या गोळ्याची सर्व राज्यांना शिफारस देखील केली आहे.

चिखलेवाडीतील सर्व ग्रामस्थांनी या युवा मंचच्या कार्यकर्त्यांचे व माजी उपसभापती रमेश मोरे यांचे या सहकार्या निमित्त आभार मानले.