ALL ताज्या बातम्या विशेष लेख संपादकीय वाढदिवस विशेष व्यंगचित्र मुलाखत ADVT/ जाहिरात राजकारण कृषीवार्ता शैक्षणिक
मल्हारपेठ दूरक्षेत्राला स्वतंत्र पोलीस स्टेशनचा दर्जा.
October 12, 2020 • चंद्रकांत चव्हाण • ताज्या बातम्या

मल्हारपेठ दूरक्षेत्राला स्वतंत्र पोलीस स्टेशनचा दर्जा. 

पाटण | भगवंत लोहार

पाटण तालुक्यातील कापड आणि सोने चांदी खरेदीसाठी प्रसिद्ध असणारी बाजारपेठ तसेच आसपासची गावे यांच्यासाठी अपुरे पडणारे मल्हारपेठ ता.पाटण येथील पोलीस दुरक्षेत्र आता पोलीस ठाणे होणार आहे तसा शासनाचा आदेश निघाला असून उंब्रज पोलीस ठाण्याच्या अंतर्गत येणारे चाफळ पोलीस दुरक्षेत्र आणि मल्हारपेठ दुरक्षेत्र मिळून आता मल्हारपेठ पोलीस ठाणे बनणार असल्याने परिसरातील कायदा व सुव्यवस्था राखणे आता सोयीचे होणार आहे

पाटण तालुक्यात पाटण, कोयनानगर आणि ढेबेवाडी याठिकाणी पोलीस ठाणे असून तळमावले, मल्हारपेठ, तारळे , बेलवडे खुर्द आणि चाफळ ही पोलीस दुरक्षेत्र आहेत पैकी चाफळ हे कराड तालुक्यातील उंब्रज पोलीस ठाण्याच्या अंतर्गत येते.पोलीस दुरक्षेत्र असली तरी तेथील बराचसा कारभार संबंधित पोलीस ठाण्यामार्फत चालत असतो तालुक्यातील बेलवडे खुर्द दुरक्षेत्र फक्त नावालाच उरले होते मुळातच हे दुरक्षेत्र एका बाजूला असल्याने असून अडचण आणि नसून खोळंबा असे होते तत्कालीन पोलीस अधीक्षक प्रसन्ना यांनी तपासणीसाठी या दुरक्षेत्राला भेट दिली असता तेथील कारभार पाहून नाराजी व्यक्त केली होती तेव्हापासून येथील कारभार पाटण येथून सुरू ठेवण्यात आला होता 

मल्हारपेठ येथे पोलीस ठाणे व्हावे अशी खूप वर्षांपासूनची मागणी होती मल्हारपेठ येथे असणारा दुरक्षेत्राचा भव्य परिसर तसेच मुख्य कराड- चिपळूण मार्गालागतची जागा तसेच परिसरातील सर्व गावांना संपर्कासाठी सोयीचे ठिकाण असल्याने या मागणीला जोर मिळत होता तर सध्या गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई असल्याने त्यांच्या माध्यमातून याला अधिक जोर मिळाला असल्याने अखेर मल्हारपेठ येथे पोलीस ठाणे होण्याच्या परिसरातील जनतेच्या स्वप्नाला मूर्त स्वरूप प्राप्त होणार आहे मल्हारपेठ येथे पोलीस ठाणे होण्यामुळे सहाय्यक पोलीस निरीक्षक, पोलीस उप निरीक्षक, सहाय्यक पोलीस उप निरीक्षक 3, पोलीस हवालदार 4, पोलीस नाईक 7, पोलीस शिपाई 14 असा एकूण 30 कर्मचाऱ्यांचा फौजफाटा याठिकाणी मिळणार आहे तर संपूर्ण चाफळ विभाग, कोयना नदी तीराच्या दोन्ही बाजूंची गावे या अंतर्गत येणार असल्याने या गावातील कायदा व सुव्यवस्था राखणे सोयीचे होणार आहे मल्हारपेठ पोलीस ठाणे निर्माण करण्याचा आदेश महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाचे कार्यासन अधिकारी दिनेश सस्ते यांनी पारित केला आहे