ALL ताज्या बातम्या विशेष लेख संपादकीय वाढदिवस विशेष व्यंगचित्र मुलाखत ADVT/ जाहिरात राजकारण कृषीवार्ता शैक्षणिक
फलटण मध्ये 1 तर साताऱ्यात 2 जण पॉझिटिव्ह ; 56 जण निगेटिव्ह. सातारा सातारा जिल्ह्यातील एकूण संख्या 77.
May 3, 2020 • चंद्रकांत चव्हाण • ताज्या बातम्या

फलटण मध्ये 1 तर साताऱ्यात 2 जण पॉझिटिव्ह ; 56 जण निगेटिव्ह.

सातारा जिल्ह्यातील एकूण संख्या 77.

सातारा दि. 3 ( जि. मा. का ): क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथे पुणे जेल मधून सातारा जेलमध्ये प्रवास करुन आलेले 2 कैदी (वय वर्षे 31 व 58) व उपजिल्हा रुग्णालय, फलटण येथे बाधित रुग्णाचे निकट सहवासित 1 (वय वर्षे 6)  असे एकूण 3 नागरिकांचा कोरोना (कोविड 19)  अहवाल पॉझिटिव्ह आला असून ते कोरोना बाधित असल्याची माहिती बी.जे. वैद्यकीय महाविद्यालय, पुणे यांनी कळविले असल्याची माहिती  अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली आहे.
तर क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा  येथील 40,  ग्रामीण रुग्णालय कोरेगाव येथील 16
अशा 56 नागरिकांचे कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आल्याची माहिती डॉ. गडीकर यांनी दिली आहे.
आता सातारा जिल्ह्यात 66 रुग्ण कोरोना बाधित असून आतापर्यंत 9 (कोविड 19) मुक्त होऊन रुग्णालयातून सोडले आहेत तर 2 जणांचा मृत्यू झाला आहे. आत्तापर्यंत जिल्ह्यात एकूण 77 बाधित रुग्ण आढळले आहेत.