ALL ताज्या बातम्या विशेष लेख संपादकीय वाढदिवस विशेष व्यंगचित्र मुलाखत ADVT/ जाहिरात राजकारण कृषीवार्ता शैक्षणिक
पुणे येथून प्रवास करुन आलेला 28 वर्षीय युवक पॉझिटिव्ह.
April 28, 2020 • चंद्रकांत चव्हाण • ताज्या बातम्या

पुणे येथून प्रवास करुन आलेला 28 वर्षीय युवक पॉझिटिव्ह ,  58 अनुमानितांचे रिपोर्ट निगेटिव्ह तर 86 जणांना केले दाखल

सातारा दि. 28( जि. मा. का ) : पुणे येथून प्रवास करुन आलेल्या 28 वर्षीय युवकाला दि 25 एप्रिल  रोजी उपजिल्हा रुग्णालय, फलटण येथे दाखल करण्यात आले होते. हा युवक पॉझिटिव्ह (कोविड-19)   बाधित असल्याचे बी.जे. वैद्यकीय महाविद्यालय, पुणे यांनी कळविले आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली आहे.

या रुग्णावर पुढील उपचार   क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथे करण्यात येणार आहे.

आता सातारा जिल्ह्यात 36  रुग्ण कोविड बाधित असून आता पर्यंत 5 (कोविड 19) मुक्त होऊन रुग्णालयातून सोडले आहेत तर 2 जणांचा मृत्यू झाला आहे.

  तसेच क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथील 6, कृष्णा मेडिकल कॉलेज, कराड येथील 6, उपजिल्हा रुग्णालय, कराड येथील 44, फलटण येथील 2 असे एकूण 58 अनुमानितांचे रिपोर्ट निगेटिव्ह असल्याचे बी.जे. वैद्यकीय महाविद्यालय, पुणे यांनी कळविले आहे. तसेच 27 एप्रिल रोजी रात्री उशिरा क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा 21, उपजिल्हा रुग्णालय, कराड येथे 57, ग्रामीण रुग्णालय, कोरेगाव येथे 8 असे एकूण 86 जणांना विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले असून या सर्वांच्या या सर्वांच्या घशातील स्त्रावांचे नमुने बी. जे. वैद्यकीय महाविद्यालय, पुणे येथे तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत, अशी माहितीही डॉ. गडीकर यांनी दिली आहे.