ALL ताज्या बातम्या विशेष लेख संपादकीय वाढदिवस विशेष व्यंगचित्र मुलाखत ADVT/ जाहिरात राजकारण कृषीवार्ता शैक्षणिक
निकट सहवासित म्हणून दाखल केलेल्या पाच नागरिकांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह  ;23 जणांना केले विलगीकरण कक्षात दाखल
April 25, 2020 • चंद्रकांत चव्हाण

निकट सहवासित म्हणून दाखल केलेल्या पाच नागरिकांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह  ;23 जणांना केले विलगीकरण कक्षात दाखल.

सातारा दि. 25( जि. मा. का ) : उपजिल्हा रुग्णालय, कराड येथे बाधित रुग्णाच्या निकट सहवासित म्हणून विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आलेले 5 नागरिक कोरोना (कोविड-19) बाधित असल्याचे बी.जे. वैद्यकीय महाविद्यालय, पुणे यांनी कळविले आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली आहे.
आता सातारा जिल्ह्यात 21 रुग्ण कोविड बाधित असून आता पर्यंत 3 (कोविड 19) मुक्त होऊन रुग्णालयातून सोडले आहेत तर 2 जणांचा मृत्यू झाला आहे.
तसेच 24 एप्रिल रोजी रात्री उशिरा  क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा  येथे 23 अनुमानितांना विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले आहे. या सर्वांच्या घशातील स्त्रावांचे नमुने बी. जे. वैद्यकीय महाविद्यालय, पुणे येथे तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत, अशी माहितीही जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. गडीकर यांनी दिली आहे.