ALL ताज्या बातम्या विशेष लेख संपादकीय वाढदिवस विशेष व्यंगचित्र मुलाखत ADVT/ जाहिरात राजकारण कृषीवार्ता शैक्षणिक
दोन मृत व्यक्तींसह 23 जणांची नमुने पाठविले तपासणीला तर 117 जणांचे रिपोर्ट आले निगेटिव्ह. 
May 29, 2020 • चंद्रकांत चव्हाण • ताज्या बातम्या

दोन मृत व्यक्तींसह 23 जणांची नमुने पाठविले तपासणीला तर 117 जणांचे रिपोर्ट आले निगेटिव्ह. 

सातारा दि. 29 (जिमाका): फलटण तालुक्यातील होळ येथील 84 वर्षीय महिला व तांबवे येथील 94 वर्षीय पुरुष यांचा काल दि.28 मे रोजी मृत्यु झाला आहे. या दोघांचा कोविड संशयित म्हणून घशातील स्त्रावांचा नमुने तपासणीकरिता, पुणे येथे पाठविण्यात आला आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली.

काल रात्र उशिरा क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथील 23 जणांचे घशातील स्त्रावांचा नमुने एन.सी.सी.एस. पुणे यांच्याकडे तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. तर 177 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले असल्याचेही एन.सी.सी.एस. पुणे यांनी कळविले आहे, अशी माहितीही जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. गडीकर यांनी दिली आहे.