ALL ताज्या बातम्या विशेष लेख संपादकीय वाढदिवस विशेष व्यंगचित्र मुलाखत ADVT/ जाहिरात राजकारण कृषीवार्ता शैक्षणिक
जिल्ह्यात 31 जणांचे रिपोर्ट आले कोरोना पॉझिटिव्ह
May 30, 2020 • चंद्रकांत चव्हाण • ताज्या बातम्या

जिल्ह्यात 31 जणांचे रिपोर्ट आले कोरोना पॉझिटिव्ह

तांबवे ता. फलटण येथील 94 वर्षीय रुग्णाचा मृत्यू पश्चात रिपोर्ट आला पॉझिटिव्ह

सातारा दि. 30 (जिमाका) : सातारा जिल्ह्यातील विविध कोरोना केअर सेंटर आणि उप जिल्हा रुग्णालयामध्ये अनुमानित म्हणून दाखल असलेल्या 31 जणांचे रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. तांबवे ता. फलटण येथील 94 वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाला होता. मृत्यू पश्चात स्त्राव तपासणी घेतले होता . तो आजच्या रिपोर्टमध्ये पॉझिटिव्ह आला आहे. अशी माहिती माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली.

या बाधित रुग्णांमध्ये.

जावळी तालुक्यातील बेलावडे येथील 2 पुरुष व 2 महिला. निपाणी येथील 1 पुरुष व 1 महिला. काटवली येथील 1 पुरुष. गवडी येथील 1 महिला. रांजणी येथील 1 महिला.

सातारा तालुक्यातील वावदरे येथील 1 पुरुष. खडगाव येथील 1 महिला. कुसवडे येथील 1 पुरुष.

खटाव तालुक्यातील बनपूरी येथील 4 पुरुष व 1 महिला. वांझोली येथील 2 पुरुष व 3 महिला. पाचवड येथील 1 पुरुष.

कोरेगांव तालुक्यातील कटापूर येथील 1 पुरुष. शिरंबे येथील 1 पुरुष.

कराड तालुक्यातील खराडे येथील 1 पुरुष 2 महिला.

पाटण तालुक्यातील तामिणे येथील 2 पुरुष.