ALL ताज्या बातम्या विशेष लेख संपादकीय वाढदिवस विशेष व्यंगचित्र मुलाखत ADVT/ जाहिरात राजकारण कृषीवार्ता शैक्षणिक
जिल्ह्यात आज 8 नागरिक कोरोना बाधित
June 13, 2020 • चंद्रकांत चव्हाण • ताज्या बातम्या

जिल्ह्यात आज 8 नागरिक कोरोना बाधित

सातारा दि. 13 (जि. मा. का): आज सायंकाळी आलेल्या रिपोर्टमध्ये विविध रुग्णालयांमध्ये दाखल असणाऱ्या 8 नागरिकांचे रिपोर्ट कोरोनाबाधित आल्याची माहिती जिल्हा शल्‌यचिकीत्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली.

 

कोरोना बाधित रुग्णांमध्ये सातारा तालुक्यातील कोडोली येथील 42 वर्षीय पुरुष, वय 17 व 14 वर्षीय युवती.

खंडाळा तालुक्यातील लोणंद (आनंदगाव) येथील 38 वर्षीय महिला.

वाई तालुक्यातील शेलारवाडी येथील 57 वर्षीय पुरुष, बावधन नाका वाई येथील 25 वर्षीय पुरुष.

कराड तालुक्यातील तुळसण येथील 60 वर्षीय पुरुष

महाबळेश्वर तालुक्यामध्ये बेल एयर हॉस्पीटलमध्ये मुळचा चेंबूर मुंबई येथील 51 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.

आत्तापर्यंत जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या एकूण 726 झाली असून कोरोनातून 499 ब-या झालेल्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. विविध रुग्णालयांमध्ये कोरोनावर उपचार सुरु असणाऱ्यांची संख्या 194 इतकी झाली आहे तर 31 जणांचा मृत्यु झालेला आहे.