ALL ताज्या बातम्या विशेष लेख संपादकीय वाढदिवस विशेष व्यंगचित्र मुलाखत ADVT/ जाहिरात राजकारण कृषीवार्ता शैक्षणिक
जिल्ह्यात आज 14 कोरोनामुक्तांना डिस्चार्ज
June 7, 2020 • चंद्रकांत चव्हाण • ताज्या बातम्या

जिल्ह्यात आज 14 कोरोनामुक्तांना डिस्चार्ज; 97 नागरिकांचे घशातील नमुने कोरोना तपासणीसाठी

सातारा दि. 7 ( जि. मा. का ): कोरोनामधून पूर्णपणे बऱ्या झालेल्या क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय सातारा येथून 1, बेल एअर हॉस्पीटल पाचगणी येथून 3, कोरोना केअर सेंटर खावली येथून 1, रायगावमधून 2 व वाई येथुन 4, मायणी मेडीकल कॉलेज येथून 3 अशा एकूण 14 कोरोनमुक्त नागरिकांना आज दहा दिवसानंतरघरी सोडण्यात आल्याची माहिती डॉ. आमोद गडीकर यांनी दिली.

 

97 नागरिकांच्या घशातील स्त्रावांचे नमुने तपासणीसाठी पुण्याला

                क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालस, सातारा येथील 8, शिरवळ येथील 39, कोरोना केअर सेंटर पानमळेवाडी येथील 13 व मायणी येथील 21 व महाबळेश्वर येथील 16 अशा 97 जणांच्या घशातील स्त्रावांचे नमुने नमुने तपासणीसाठी, पुणे येथे पाठविण्यात आले आहेत, अशीही माहिती डॉ. गडीकर यांनी दिली आहे.