ALL ताज्या बातम्या विशेष लेख संपादकीय वाढदिवस विशेष व्यंगचित्र मुलाखत ADVT/ जाहिरात राजकारण कृषीवार्ता शैक्षणिक
जिल्ह्यातील 12 जण कोरोना मुक्त. 
June 3, 2020 • चंद्रकांत चव्हाण • ताज्या बातम्या

जिल्ह्यातील 12 जण कोरोना मुक्त. 

संशयीत 2 मृत व्यक्तींसह 254 जणांच्या घशातील स्त्रावांचे नमुने पाठविले तपासणीला

                सातारा दि.3 (जिमाका) : कृष्णा मेडिकल कॉलेज कराड येथून 5, कोविड केअर केंद्र खावली येथून 4 व सह्याद्री हॉस्पिटल कराड येथून 3 असे एकूण 12 कोविड बाधित रुग्णांना रुग्णालयातून दहा दिवसानंतर डिस्चार्ज देण्यात आला असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली.

                तसेच क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय सातरा येथे आज सकाळी दाखल झालेल्या मुंबई येथून प्रवास करुन आलेल्या 57 वर्षीय पुरुष रा. वडुज ता. खटाव यांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला असून संशयित म्हणून तर मुंबईवरुन आलेल्या गुरसाळे ता. खटाव येथील 73 वर्षीय याचा मृत्यू झाला असून या दोघांचा संशयीत म्हणून त्यांच्या घशातील स्त्रावाचा नमुना तपासणीकरीता पुणे येथे पाठविण्यात आला आहे.

 

254 जणांच्या घशातील स्त्रावांचे नमुने पाठविले तपासणीला

 

                क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुगणालय सातारा येथील 29, वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय कराड येथील 62, कृष्णा मेडिककल कॉलेज येथील 13, ग्रामीण रुग्णालय वाई येथील 18, ग्रामीण रुग्णालय खंडाळा येथील 76, ग्रामीण रुग्णालय कारेगांव येथील 2, उपजिल्हा रुग्णालय फलटण येथील 36 व रयगाव येथील 18 असे एकूण 254 जणांच्या घशातील स्त्रावांचे नमुने एन.सी.सी.एस. पुणे व कृष्णा मेडिकल यांच्याकडे तपासणी करीता पाठविण्यात आले असल्याची माहितीही डॉ. गडीकर यांनी दिली.