ALL ताज्या बातम्या विशेष लेख संपादकीय वाढदिवस विशेष व्यंगचित्र मुलाखत ADVT/ जाहिरात राजकारण कृषीवार्ता शैक्षणिक
जिल्ह्यातील दहा नागरिकांचा रिपोर्ट आला पॉझिटिव्ह;
June 8, 2020 • चंद्रकांत चव्हाण • ताज्या बातम्या

जिल्ह्यातील दहा नागरिकांचा रिपोर्ट आला पॉझिटिव्ह;

   यातील दोघांचा मृत्यु पश्चात रिपोर्ट पॉझिटिव्ह तर 181 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह   

सातारा दि. 8 (जिमाका) : सातारा जिल्हयातील दहा जणांचे रिपोर्ट कोराना बाधित आले आहेत. यामध्ये खडाळा तालुक्यातील आसवली येथील 60 वर्षीय पुरुषाचा उपचारादरम्यान तर मुंबई येथून प्रवास करुन आलेल्या वाई तालुक्यातील पसरणी येथील 75 वर्षीय पुरुषाचा घरीच मृत्यु झाला आहे. या दोघाचा मृत्यु पश्चात रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत, अशी माहिती जिल्हा शल्यचिक्सिक डॉ. अमोद गडीकर यांनी दिली आहे.

बाधित रुग्णांमध्ये वाई तालुक्यातील पसरणी येथील 75 वर्षीय पुरुष (मृत) व सोमेश्वरवाडी येथील 68 वर्षीय महिला.

खंडाळा तालुक्यातील आसवली येथील 60 वर्षीय पुरुषाचा संजीवनी हॉस्पिटल, सातारा येथे उपचारा दरम्यान मृत्यु  

 झाला असून या पुरुषाला सारीचा आजार होता.

खटाव तालुक्यातील पाचवड येथील 30 वर्षीय पुरुष व विसापूर येथील 71 व 62 वर्षीय पुरुष

जावली तालुक्यातील काळोशी येथील 39 वर्षीय महिला व प्रभुचीवाडी येथील 28 व 26 पुरुष व 50 वर्षीय महिला यांचा समावेश आहे. 

181 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह

 एन.सी.सी.एस, पुणे यांच्याकडून रात्री उशिरा प्राप्त झालेल्या रिपोर्टनुसार 181 जणं निगेटिव्ह आले आहेत, अशी माहितीही डॉ. गडीकर यांनी दिली आहे.