ALL ताज्या बातम्या विशेष लेख संपादकीय वाढदिवस विशेष व्यंगचित्र मुलाखत ADVT/ जाहिरात राजकारण कृषीवार्ता शैक्षणिक
जिल्हादंडाधिकारी यांचे आदेशानुसार 30 जून पर्यंत जिल्ह्यात रात्री 9 ते पहाटे 5 पर्यंत पेट्रोल पंप सुरु
June 19, 2020 • चंद्रकांत चव्हाण • ताज्या बातम्या

 

जिल्हादंडाधिकारी यांचे आदेशानुसार 30 जून पर्यंत

जिल्ह्यात रात्री 9 ते पहाटे 5 पर्यंत पेट्रोल पंप सुरु

 

सातारा दि. 19 (जिमाका) : सातारा जिल्ह्यात सर्व प्रकारची वाहने व अत्यावश्यक सेवेतील वाहने यांना इंधन पुरवठा सुलभ होण्याच्या दृष्टीने जिल्हादंडाधिकारी शेखर सिंह यांनी सातारा जिल्ह्यात दि. 20 जून 2020 रोजीच्या 00.00 वाजले पासून ते दि. 30 जून 2020 रोजीच्या 24.00 या कालावधीत रात्री 9.00 ते पहाटे 5.00 वाजेपर्यंत इंधन पंप चालु ठेवण्यास परवानगी दिली आहे.

 

            तथापि, रात्री रात्री 9.00 ते पहाटे 5.00 या कालावधीत चालू असणाऱ्या इंधन पंपावर अत्यावश्यक सेवेतील वाहने व सर्व प्रकारची मालवाहूकीची वाहने यांनाच इंधन पुरवठा करणे बंधनकार राहील.