ALL ताज्या बातम्या विशेष लेख संपादकीय वाढदिवस विशेष व्यंगचित्र मुलाखत ADVT/ जाहिरात राजकारण कृषीवार्ता शैक्षणिक
गुणवंत विद्यार्थ्यांच्या घरी जावून ‘स्पंदन’ च्या वतीने सत्कार
July 30, 2020 • चंद्रकांत चव्हाण • ताज्या बातम्या

कु.पौर्णिमा भरत डाकवे हिच्या सत्काराप्रसंगी तिला पेढा भरवताना चि.स्पंदन डाकवे सोबत संस्थापक अध्यक्ष डाॅ.संदीप डाकवे, सौ.गयाबाई डाकवे

गुणवंत विद्यार्थ्यांच्या घरी जावून ‘स्पंदन’ च्या वतीने सत्कार

तळमावले/वार्ताहर

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत घेण्यात आलेल्या दहावी परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला. या परीक्षेत यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांच्या सत्कार त्यांच्या घरी जावून करण्यात आला. पाटण तालुक्यातील डाकेवाडी (काळगांव) येथील स्पंदन चॅरिटेबल ट्रस्ट यांच्यावतीने हा अनोखा उपक्रम राबवला गेला. कोरोनाच्या पाश्र्वभूमीवर कोणताही जाहीर कार्यक्रम न घेता शासनाच्या सर्व नियमांचे पालन करत हे छोटेखानी सत्कार केले गेले.

डाकेवाडीतील इ.10 वी मध्ये यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांच्या स्पंदन चॅरिटेबल ट्रस्ट च्या वतीने शाल, पुस्तक व पेढे देवून कौतुक करण्यात आले. या आगळया वेगळया कौतुक सोहळयामुळे विद्याथ्र्यांचे पालक देखील भारावून गेले. या कौतुक सोहळयाप्रसंगी ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष डाॅ.संदीप डाकवे, श्री.राजाराम डाकवे , सौ.गयाबाई डाकवे, सचिव सौ.रेश्मा डाकवे, चि.स्पंदन डाकवे, चि.प्रथमेश डाकवे उपस्थित होते.

सामाजिक कार्यात नेहमीच अग्रभागी असलेल्या स्पंदन ट्रस्टच्या माध्यमातून शैक्षणिक क्षेत्रात आपले योगदान देत आहे. यापूर्वी ज्ञानाची शिदोरी, माणुसकीच्या वहया, शालेय साहित्य वाटप, गणवेश वितरण, शाळांना महापुरुषांच्या प्रतिमांचे वाटप, बॅग वाटप, संगणक वितरण असे उपक्रम राबवले आहेत. याशिवाय अंगणवाडी आणि जि.प.शाळांच्या भिंती बोलक्या करण्याचे काम देखील केले आहे.