ALL ताज्या बातम्या विशेष लेख संपादकीय वाढदिवस विशेष व्यंगचित्र मुलाखत ADVT/ जाहिरात राजकारण कृषीवार्ता शैक्षणिक
खा.शरद पवार यांच्याकडून रेमडेसिवीर इंजेक्शन जिल्हाधिकारी यांच्याकडे सुपूर्द
August 9, 2020 • चंद्रकांत चव्हाण • ताज्या बातम्या

सातारा जिल्ह्यसाठी गृह विलगीकरण उपाययोजना पुस्तिकेचे आरोग्यमंत्री यांच्या हस्ते प्रकाशन

▪️ खासदार शरद पवार यांच्याकडून रेमडेसिवीर इंजेक्शन कोल्हापूर आणि सातारा जिल्हाधिकारी यांच्याकडे सुपूर्द

 

सातारा दि. 9 (जि. मा. का) : सातारा जिल्हा प्रशासनाकडून कोरोना विषणासंदर्भात करावयाच्या उपाययोजना व घ्यावयाची काळजी या संदर्भात गृह विलगीकरण पुस्तीका तयार करण्यात आली आहे, या पुस्तिकेचे प्रकाशन आज कराड येथील यशवंतराव चव्हाण स्मृती सदनात करण्यात आले. 

 प्रकाशन सोहळा सार्वजनिक आरोग्यमंत्री राजेश टोपे, खासदार शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थिती पार पडला. यावेळी विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, सहकार मंत्री तथा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई, आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर, कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री सतेज पाटील, खासदार श्रीनिवास पाटील, खासदार संजय मंडलिक, आरोग्य विभागाचे प्रधान सचिव प्रदिप व्यास, सातारचे जिल्हाधिकारी शेखर सिंह, कोल्हापूरचे जिल्हाधिकारी दौलत देसाई, कोल्हापूर परीक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुहास वारके , सातारा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय भागवत, पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, कोल्हापूरचे पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख आदी उपस्थित होते.

 खासदार शरद पवार यांच्या प्रयत्नातून सातारा व कोल्हापूर जिल्ह्यातील गरीब नागरिकांना रेमडेसिवीर इंजेक्शन उपलब्ध करुन देण्यात आले आहे. रेमडेसिवीर इंजेक्शन मान्यवरांच्या उपस्थितीत सातारचे जिल्हाधिकारी शेखर सिंह व कोल्हापूरचे जिल्हाधिकारी दौलत देसाई सुपूर्द करण्यात आले.