ALL ताज्या बातम्या विशेष लेख संपादकीय वाढदिवस विशेष व्यंगचित्र मुलाखत ADVT/ जाहिरात राजकारण कृषीवार्ता शैक्षणिक
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कुंभारगांव येथे सोमवार पासून ८ दिवस जनता कर्फ्यू.
September 19, 2020 • चंद्रकांत चव्हाण • ताज्या बातम्या

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कुंभारगांव येथे सोमवार पासून ८ दिवस जनता कर्फ्यू.

"माझे कुटूंब माजी जबाबदारी" मोहीम यशस्वीपणे राबविण्याचा निर्णय.

कुंभारगांव / प्रतिनिधी: 

ग्रामपंचायत कुंभारगाव ता पाटण. येथील ग्रामसदस्य नियंत्रण समिती व कुंभारगाव ग्रामपंचायत अंतर्गत सर्व वाड्या वस्तीतील ग्रामस्थ, नागरिक यांनी स्वतः जनता कर्फ्यू मोहीम राबवण्यासाठी व "माझे कुटूंब माजी जबाबदारी" या मोहीमे अनुषंगाने सर्वपक्षीय बैठक संपन्न झाली. या बैठकीत कुंभारगाव परिसरात कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत असून त्याची साखळी तोडणे आवश्यक आहे, नागरिकांनी स्वतः दक्षता घेऊन या मोहिमेत सामील होऊन कोरोना समिती, ग्रामपंचायत कुंभारगाव यांना नागरिकांनी सहकार्य करावे असा निर्णय घेण्यात आला. 

या मिटींग मध्ये तळमावले प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. गोंजारी, ग्रामसेवक अनिल जाधव, कोरोना समिती अध्यक्ष, बा.दे.स.का मरळीचे माजी चेअरमन डॉ दिलीपराव चव्हाण, माजी अर्थ, शिक्षण सभापती संजय देसाईं, कोरोना समिती अध्यक्ष माजी उपसरपंच राजेंद्र पाटील, माजी उपसरपंच राजेंद्र चव्हाण, माजी प.समिती सदस्य शंकराव चव्हाण, आरोग्य सेवक बोकरे, आरोग्य सेविका सौं कांबळे मॅडम, पोलीस पाटील, पत्रकार राजेंद्र पुजारी, कॅमेरामन अनिल देसाईं, ग्रामस्थ उपस्थित होते. 

ग्रामसेवक अनिल जाधव म्हणाले लॉकडाऊन कालावधीत सर्व नागरिकांनी सहकार्य केले. आता अनेक नागरिकांची आर्थिक परस्थिती बिकट आहे, लॉकडाऊन परवडत नाही, परंतु सद्या कुंभारगाव मध्ये कोरोनाचे पेशंट वाढताना दिसत आहेत, परिस्थिती गंभीर आहे, कोरोनाची साखळी तोडणे आवश्यक असून नागरिकांनी सहकार्य केल्या शिवाय शक्य नाही, नागरिकांनी स्वतः जागरूक राहून जनता कर्फ्यूला सोमवार 21/9 /2020. ते 28/9/2020.पर्यंत प्रतिसाद द्यावा. या कालावधी मध्ये कुंभारगांव व सर्व  वाडीवस्तीतील सर्व प्रकारची दुकाने बंद राहतील याची ग्रामस्थांनी नोंद घ्यावी.

या वेळी बोलताना तळमावले प्राथमिक आरोग्य केंद्राचे अधिकारी डॉ.उमेश गोंजारी यांनी सद्य स्थितीवर मोलाचे मत मांडले "माझे कुटूंब माजी जबाबदारी" यावर प्रत्येक नागरिकाने जागरूक राहून स्वतःची काळजी घ्या काही अडचणी असल्यास प्राथमिक आरोग्य केंद्राशी संपर्क करा असे आवाहन केले.       

डॉ.दिलीपराव चव्हाण म्हणाले आज कुंभारगाव मध्ये कोरोनाचे पेशंट वाढत आहेत हि परस्थिती भयावह आहे, याची प्रत्येक नागरिकाने गंभीर दखल घेणे काळाची गरज आहे, आज जीव वाचला तरच आपण जगू शकू त्यामुळे कोरोनाची साखळी तोडणे गरजेचे आहे, मास्क वापरा ते रोजच्या रोज गरम पाण्यातून स्वछ धूऊन वापरा. एकमेकांपासून तीन फूट अंतर ठेवा तरच आपण यावर मात करू शकू.             

 राजेंद्र चव्हाण म्हणाले आरोग्य विभागाने कुंभारगाव परिसरातील नागरिकांसाठी उप प्राथमिक केंद्रात गरजेची औषधे उपलब्ध करावी. रोज किंवा ठराविक वेळेत आरोग्य कर्मचारी किंवा डॉक्टर येथे उपलब्ध असावा असे मत मांडले.                 

कोरोना समिती अध्यक्ष राजेंद्र पाटील यांनी कोरोना कमिटीला नागरिकांनी सहकार्य करावे व "माझे कुटूंब माजी जबाबदारी" हि मोहीम गावात यशस्वीपणे राबविण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे. 

शेवटी उपस्थित सर्वांचे आभार दै. कृष्णाकाठचे कॅमेरामन अनिल देसाईं यांनी मानले.